ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव:- जिल्हा परिषद शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव साजरी.
प्रतिनिधी :-कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

लोहगाव( वार्ताहर )राहता तालुक्यातील लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापिका डिंबर चंदाराणी .श्रीमती चेचरे प्रतिभा. मेहेर बाळासाहेब. झरेकर चारुशीला .कदम नंदू .साळुंके विजया .अंत्रे शशिकांत. यावेळी अण्णाभाऊ साठे यांनी गायलेली गाणी विद्यार्थ्यांना ऐकू घातली .त्याचबरोबर विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.