श्रीरामपूर:-महांकाळ वाडगांव ता श्रीरामपुर गोदावरी नदीवरील 8 – 9 शेतकऱ्यांचे मोटारींची केबलची चोरी – चोऱ्यांमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आंदोलनाच्या पावित्र्यात.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-महांकाळ वाडगांव ता श्रीरामपुर गोदावरी नदीवरील 8 – 9 शेतकऱ्यांचे मोटारींची केबलची चोरी – चोऱ्यांमुळे शेतकरी वर्ग त्रस्त आंदोलनाच्या पावित्र्यात.

श्रीरामपुर / महांकाळ वाडगांव ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) महांकाळ वाडगांव श्रीरामपुर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या नीलेश शेडगे , प्रकाश वानखेडे , दिलीप चोरमल , नारायण चोरमल , प्रसाद निघुट , दादासाहेब आव्हाड , भीमाशंकर आव्हाड , राहुल चोरमल , आदी शेतकऱ्यांच्या मोटर केबालिंची २९ ऑगस्ट रात्री चोरी झाली आहे , त्याची फिर्याद आज 3 सप्टेंबर रोजी रोजी उशिराने पोलिसांनी दाखल करून घेतली आहे . तालुक्यातील शेतकऱ्यांना आधीच पावसाने संकटात आणले आहे त्यात अजून चोरांनी भर टाकली आहे तालुक्यात महिन्यापासून पाऊस नाही त्यामुळे शेतकरी पिकांना संरक्षित पाणी देत आहेत त्यातही आता शेतकऱ्यांसमोर शेतीतील मोटर चोरी , केबल , चोरी , स्टार्टर , चोरी ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरी ‘ सोलर पॅनल बॅटरी चोऱ्या अशा चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना आला आहे अनेक दिवसापासून गोदावरी नदीकाठच्या भामाठाण , खानापुर , माळवाडगाव , महांकाळ वाडगांव , सरला , माळेवाडी ,खैरी निमगाव , दिघी ‘ सह तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीतील मोटर ‘ केबल ,बॅटरी चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे , पोलीस प्रशासनाकडून या चोऱ्यांची फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली केली जाते आहे तालुक्यात विविध गावात रोज लाखोंच्या शेती साहित्याच्या चोऱ्या होतंच आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाल्याने या शेती चोऱ्यांचा तपास करून चोरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी चोरांनी त्रस्त झालेले शेतकरी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत ‘ पोलिस प्रशासनाने या शेती चोरांचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तालुक्यातील शेतकरी उग्र आंदोलन करण्याचा तयारीत आहेत अशी माहिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष श्री नीलेश शेडगे यांनी दिली आहे.




