महाबळेश्वर:-भारती विद्यापीठ हायस्कूल गोडवली पाचगणी च्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून श्रमदानाचे आयोजन.
पत्रकार अमोल चोरगे महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भारती विद्यापीठ हायस्कूल गोडवली पाचगणी च्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून श्रमदानाचे आयोजन.

दिनांक 15 ऑक्टोबर 2026 वार गुरुवार रोजी भारती विद्यापीठ हायस्कूल गोडवली पाचगणी च्या वर्धापन दिनानिमित्त शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून श्रमदानाचे आयोजन करण्यात आले. श्रमदानाची वेळ सायंकाळी तीन ते पाच अशी ठरवण्यात आली. होती.श्रमदानासाठी 2011 माननीय श्री. दीपक आनंदा मालुसरे, 2016 बॅचचे अनिकेत चव्हाण तसेच 2024 बॅचचे रीहान हुलूर हे उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. पवार आर.बी. सर यांनी विद्यार्थ्यांना घरून कुदळ, फावडे, घमेली, खुरपे, विळा इत्यादी साहित्य आणण्यास सांगितले होते. या श्रमदाना मध्ये शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
माजी विद्यार्थ्यांनी देखील येताना स्वतः सोबत कुदळ फावडे आणले होते. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय श्री. पवार सर यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून श्रमदानाची सांगता करण्यात आली. तसेच माझी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी शाळेला सहकार्य करावे अशी त्यांना विनंती केली. अशा पद्धतीने श्रमदानाचे काम उत्साहात पार पडले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



