आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आष्टी:-मध्यरात्री फ्रिजचा जोरदार स्फोट; आगीने घेतले रौद्ररूप, सुदैवाने जीवितहानी टळली!

पत्रकार अमजद शेख बीड जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) आष्टी:-मध्यरात्री फ्रिजचा जोरदार स्फोट; आगीने घेतले रौद्ररूप, सुदैवाने जीवितहानी टळली!

बीड : प्रतिनिधी : आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे मध्यरात्रीच्या सुमारास फ्रिजचा भीषण स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत घरातील किचनसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक तुकाराम वामन यांच्या घरात रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना फ्रिजमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
स्फोटानंतर किचनमध्ये लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीत फ्रिज, भांडी, रॅक, धान्य तसेच इतर महत्त्वाचे संसारोपयोगी साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले. या घटनेमुळे अशोक वामन यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे उंदरखेल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मध्यरात्री फ्रिजचा स्फोट; कुटुंबाचा संसार आगीत उद्ध्वस्त, जीवितहानी टळली!

2) आष्टी:-उपचाराच्या बहाण्याने १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग; आष्टी पोलिसांत डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल.

तालुक्यातील कडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा संबंधित रुग्णालयातील डॉक्टरने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांनी डॉ. महेंद्र पटवा (पटवा हॉस्पिटल, कडा) यांच्याविरुद्ध विनयभंग व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती शनिवारी (दि. २९) आपल्या आई-वडिलांसोबत कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. त्यानंतर रविवारी (दि. ३०) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास डॉक्टरने तपासणीच्या बहाण्याने तिला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून घेतले.
यानंतर डॉक्टरने तिच्या नातेवाईकांना बाहेर पाठवून केबिनचा दरवाजा आतून बंद केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. डॉक्टरने तिच्याशी अश्लील वर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित तरुणीने या प्रकाराला विरोध केला असता, डॉक्टरने तिला बाहेर कोणाला काही सांगितल्यास बदनामी करण्याची तसेच विषारी इंजेक्शन देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या भयानक प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने केबिनचा दरवाजा उघडून बाहेर धाव घेतली आणि घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. भीती आणि बदनामीच्या धास्तीमुळे कुटुंबीयांनी सुरुवातीला घरी निघून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या दिवशी पीडितेने धाडस करून आष्टी पोलिसांत धाव घेत संपूर्ण प्रकाराची रीतसर तक्रार नोंदवली.
फिर्यादीवरून आष्टी पोलिसांनी डॉ. महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनेमुळे कडा परिसरात संताप व्यक्त होत असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button