आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोलापूर:-WOW’ संघटनेतर्फे बेघर निवारा केंद्रात रक्षाबंधन उत्साहात साजरा.
पत्रकार संगीता फाळके पुणे शहर महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सोलापूर:-WOW’ संघटनेतर्फे बेघर निवारा केंद्रात रक्षाबंधन उत्साहात साजरा.

सोलापूर:- ‘WOW’ संघटनेच्यावतीने यंदा कुमठा नाका येथील ‘आपुलकी बेघर निवारा केंद्र’ येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रातील गोरगरीब व वंचित घातकातील निराधार बांधवांना प्रेमाने आपुलकीने आणि सन्मानाने राख्या बांधून व मिठाई वाटून हा सण साजरा करण्यात आला.याप्रसंगी या बांधवानच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.
या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकारी सौ.विद्या लोलगे, पुष्पा हलकुडे,मार्था आसादे,शारदा मसूती, शोभा गायकवाड आणि स्वाती मुकणार उपस्थित होत्या.हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी निवारा केंद्राचे व्यवस्थापक श्री. अशोक वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आणि त्यांनी राखी पौर्णिमेचा हा सण वंचित मुलांसमवेत साजरा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.





