क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे : सणोत्सवात भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई; ३ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे जप्त, २ आरोपी अटकेत!

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे : सणोत्सवात भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई; ३ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे जप्त, २ आरोपी अटकेत!

 भारती विद्यापीठ :-सणोत्सवाच्या कालावधीत मागील दोन दिवसात भारती विद्यापीठ पोलीसांकडुन तीन गावठी बनावटीचे कट्टे व चार जिवंत काडतुस जप्त, दोन गुन्हे दाखल करुन दोन आरोपींना अटक.

भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

सणोत्सवाच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदारांनी ३ गावठी बनावटीचे कट्टे व ४ जिवंत काडतुसे जप्त करुन, २ बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगल्याने गुन्हे दाखल करुन, २ आरोपी अटक करण्यात आले आहे. सदर कामगिरीचा घटनाक्रम खालीलप्रमाणे.

दिनांक २६/०८/२०२६ रोजी पोलीस उप निरीक्षक रवि जाधव, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना २३.५२ वा. चे सुमारास साई सिध्दी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यानच्या श्रीकोचींग क्लासेसच्या समोरील गल्लीमध्ये इसम नामे ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार, वय १८ वर्षे, (जन्म दिनांक २०/०८/२००८) रा. तापकीर चाळ, साई सिध्दी चौकाजवळ, शिवशंभो गल्ली क्रमांक २, आंबेगाव पठार, पुणे हा त्याचे ताब्यात १ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसांसहीत मिळुन आल्याने त्याचेकडुन ते जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४१/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २७/०८/२०२६ रोजी तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कात्रज डेअरी चौक ते सरहद् चौक दरम्यानचे कात्रज डेअरीचे भिंतीलगत एक इसम अग्नीशस्त्रासह थांबला आहे. त्याप्रमाणे नमुद ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेत असताना इसम नामे शिरीष जितेंद्र खोपडे, वय २६ वर्षे, रा. श्री गणेश निवास, जगदंब बिर्याणी समोर, सव्र्व्हे नंबर ३२/१० आंबेगाव पठार, पुणे हा त्याचे ताब्यात २ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसांसहीत मिळुन आल्याने त्याचेकडुन ते जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४४/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम

३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला

आहे. नमुद दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवि जाधव, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मल्लीकार्जुन कोळी, कृष्णा म्हस्के, यांच्या पथकाने केली आहे.

/ 20/08 (सुदर्शन गायकेवाड)वरीष्ठ पोलीस निरीक्षक

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button