क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-माध्यम स्वातंत्र्यावर घाला? मंदार गोंजारी प्रकरणी सातारा पत्रकार संघाचा प्रशासनाला थेट सवाल!

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-माध्यम स्वातंत्र्यावर घाला? मंदार गोंजारी प्रकरणी सातारा पत्रकार संघाचा प्रशासनाला थेट सवाल!

सातारा | दि. २९ : पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने सातारा पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. पत्रकाराने जनतेचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का? असा थेट सवाल उपस्थित करत संघाने या कारवाईचा तीव्र निषेध नोंदविला आहे.
या प्रकरणी सातारा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेत निवेदन सादर केले. गोंजारी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा अन्यायकारक असल्याचा दावा करत त्याची निष्पक्ष चौकशी करून कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले मंदार गोंजारी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ते वार्तांकनासाठी पुण्यातील सीओईपी महाविद्यालयात गेले होते. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या तसेच प्रशासनाबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांना माध्यमातून वाचा फोडल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्या समस्या समोर आणणाऱ्या पत्रकारावरच कारवाई का? असा सवाल पत्रकार संघाने उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तोडगा काढणे अपेक्षित असताना पत्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणे हा चिंतेचा विषय असल्याचे संघाने म्हटले आहे.
पत्रकार हा समाजातील विविध घटकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. सार्वजनिक हिताच्या विषयांवर प्रश्न विचारणे, संबंधितांची भूमिका जाणून घेणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे पत्रकारितेचे मूलभूत कार्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी व्हावी आणि पत्रकार गोंजारी यांच्यावर झालेल्या कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी पत्रकारांनी केली.
सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण प्रकरणाची माहिती देत पत्रकारांच्या भावना त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
याप्रसंगी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, उपाध्यक्ष उमेश बांबरे, खजिनदार अमित वाघमारे, पदाधिकारी चंद्रकांत देवरुखकर, रिझवान सय्यद, मीना शिंदे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रतीक भद्रे, विनित जवळकर, सिद्धार्थ लाटकर, रघुनाथ कुंभार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

2) भुईंज:-सुरुर पुलाखाली पिस्तूल घेऊन ‘रात्रीचा खेळ’; भुईंज पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या!

४५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त; न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी.

सातारा | वाई, दि. २९ : सुरुर (ता. वाई) येथील पुलाखाली मध्यरात्री कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल खोचून संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रसाद शुक्राचार्य बागल (रा. सुरुर, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सुरुर परिसरात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची धाव
भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे पोलीस पथकासह २८ ऑगस्ट रोजी रात्री कवठे गावच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत सुरुर पुलाखाली एक तरुण कमरेला पिस्तूल लावून उभा असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस हवालदार आप्पा कोलवडकर यांनी पंचांना बोलावून घेतले. त्यानंतर सपोनि ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तातडीने सुरुर पुलाखाली धाव घेतली.
झडती घेताच पिस्तूल सापडले
पोलिसांना मिळालेल्या वर्णनाशी जुळणारा तरुण पुलाखाली संशयास्पद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी तत्काळ पिस्तूल जप्त करून तरुणाला अटक केली.
बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भुईंज पोलीस ठाण्याच्या परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, तसेच पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ आणि सागर मोहिते यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करीत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button