कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आष्टी:-कडा येथे ‘नागाजी बेनटेक्स ज्वेलरी’च्या नवीन दालनाचे दिमाखात उद्घाटन.

पत्रकार अमजद शेख बीड जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आष्टी:-कडा येथे ‘नागाजी बेनटेक्स ज्वेलरी’च्या नवीन दालनाचे दिमाखात उद्घाटन.

संतोष शेठ शिंगवी यांच्या नव्या व्यवसायाला मान्यवरांच्या शुभेच्छा; व्यापारी बांधवांची उपस्थिती
कडा | प्रतिनिधी : कडा येथे ‘नागाजी बेनटेक्स ज्वेलरी’ या संतोष शेठ शिंगवी यांच्या नवीन दुकानाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी बांधव आणि नागरिक उपस्थित राहून संतोष शेठ शिंगवी यांना नवीन व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष व रिलस्टार दिपक भैय्या गरुड यांनी उपस्थित राहून नवीन ज्वेलरी दालनाची पाहणी केली तसेच संतोष शेठ शिंगवी यांचे अभिनंदन करून व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी धनु भाऊ मुथा यांच्यासह कडा येथील विविध दुकानांचे मालक व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन व्यवसाय सुरू केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी शिंगवी कुटुंबीयांचे कौतुक केले.
कडा परिसरात विविध प्रकारच्या व्यवसायांना चालना मिळत असून, ‘नागाजी बेनटेक्स ज्वेलरी’च्या माध्यमातून ग्राहकांना दागिन्यांची दर्जेदार सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्यामुळे दुकान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापारी, मित्रपरिवार आणि नागरिकांनी संतोष शेठ शिंगवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button