लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नागठाणे येथे उत्साहात साजरी.
प्रतिनिधी:-महेश मोहिते सातारा:-9167564361

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नागठाणे येथे उत्साहात साजरी.
नागठाणे तालुका सातारा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जय मल्हार मित्र मंडळ यांनी प्रथम सकाळी सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांनी व्यासपीठावरील अण्णाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले व नंतर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव तालुका वाळवा या गावी जाऊन त्यांच्या राहत्या घरून त्यांच्या सामाजिक विचारांची ज्योत अण्णाभाऊ चे वंशज सचिन साठे यांच्या हास्ते प्रज्वलित करून मंडळाचे अध्यक्ष प्रशांत मोहिते यांनी मार्गस्थ केली ज्योत घेऊन धावण्याचे काम अनिकेत मोहिते व कार्यकर्ते यांनी केले सायंकाळी आण्णा भाऊ साठे यांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची व महापुरुषांच्या विचाराच्या ज्योतीची भव्य दिव्य ढोल ताशा बॅजोच्या गजरात नागठाणे नगरीत मिरवणूक काढण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो घोषणा नी परिसर दणाणून गेला होता या कार्यक्रमात अध्यक्ष प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मित्रमंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या प्रकारे पार पाडले