ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रसिध्दीपत्रक नवी मुंबई रिक्षा चालकांना मीटर भाववाढ लवकरच जाहीर होणार.

प्रतिनिधी:- आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

प्रसिध्दीपत्रक
नवी मुंबई रिक्षा चालकांना मीटर भाववाढ लवकरच जाहीर होणार.
💐💐💐💐💐💐💐💐💐

महाराष्ट्र प्रतिनिधी = अशितोष चव्हाण RPS इंटरनॅशनल प्रेस रोपोर्टर असोसिएशन & RPS स्टार न्यूज.

नवी मुंबई कोकण पनवेल विभागात गेली अनेक वर्षे सी एन जी इंधनाचे दर गगनाला भिडल्याने नवी मुंबई कोंकण ,पनवेल विभागातील रिक्षा चालक त्रस्त असून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिवाह करणे रिक्षा चालकांना मुश्किल होत आहे. त्यामधे 2 वर्षे लोकडाऊनमध्ये रिक्षा चालक पूर्णपणे कर्जबाजारी झलेला आहे. भरमसाठ महागाई चटके सोसत आपले जीवन जगत आहे याअगोदर महाराष्ट्र शासनाकडे रिक्षा चालकाच्या मागण्या बाबत व रिक्षाची हक्काची भाव वाढ मिळण्या करिता नवी मुंबई रिक्षा महासंघ तसेच क्रांती रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती महाराष्ट्र राज्याच्या वतीने तात्कालीन महाराष्ट्र सरकारकडे संस्थापक/अद्यक्ष कासमभाई मुलाणी.
नवी मुंबई अद्यक्ष मचिंद्र तांडेल यांनी अनेक वेळा निवेदने देणे ,इमेल द्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता परंतु तत्कालीन सरकारने रिक्षा चालकांच्या प्रश्नाकडे गंभीर्यने पाहिले नाही.
परंतु नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये एक रिक्षा चालक एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना एक आशेचा किरण दिसू लागला असल्याने नवी मुंबई रिक्षा महासंघ व क्रांती रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नव नियुक्त मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त याना रिक्षा चालकांना 1)हक्काची मीटर भाव वाढ जाहीर करणे,2) रिक्षा चालकांचे सामाजिक कल्याणकारी महामंडळ घोषित करण्यात आलेले आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करणे. 3) मुक्त रिक्षा परवाने वाटप तात्काळ बंद करणे इ मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे आमच्या प्रतिनिधीने क्रांती रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक श्री कासमभाई मुलाणी यांच्याशी बातचीत केली असता एक रिक्षा चालक या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याने रिक्षा चालकांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असा आशावाद व्यक्त करून महाराष्ट्र शासन लवकरच रिक्षा चालकांना हक्काची मीटर भाव वाढ जाहीर करून इतर मागण्याचाही विचार करतील असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले•

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button