ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिल्लोड :-पहिल्या श्रावण सोमवारी , अंबऋषी अमसरी येथे भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली :

प्रतिनिधी:- गजानन काळे औरंगाबाद :-9834313401

सिल्लोड :-पहिल्या श्रावण सोमवारी , अंबऋषी अमसरी येथे भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली :

श्रावण महिन्यात विशेष महत
;
सिल्लोड तालुक्यातील अमसरी जगप्रसिद्ध येथील अंबऋषी देवस्थान म्हणून असलेल्या पुरातन महादेव देवस्थानी श्रावण महिन्याचा १ अगस्ट पहिल्या सोमवारी पहाटेपासूनच अंबऋषी मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.अनेक ठिकाणावरुन भाविक भक्त दर्शनासाठी येतात.
श्रावण माहिण्यातील सोमवारला विशेष महत्व असते. श्रावण सोमवार निमित्तअंबऋषी मंदीरात पहाटे पाच वाजेपासूनच भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती. तसेच तासोंतास रांगेत उभे राहुन देवाचे भाविकांनी शांततेने दर्शन घेतले.
हर हर महादेव,ओम नम. शिवायचा जयघोष करत सकाळी कृष्णा गिरी महाराजांनी आरती,मंत्रोचारात अभिषेक व पूजा करण्यात आली होती. अंबऋषी देवाला भाविकांनी दुध व बेलपत्र अर्पण केले . अंबऋषी मंदीरातील पिंडच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महादेवच्या पिंडीवर दुध,बेलपत्र,फुल हार अर्पण करण्यासाठी माहिलासह मोठया संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. तसेच मंदीर परीसरात हार,पानफुल, नारळ, पेडा, खेळण्याच्या साहित्याची चांगलीच विक्री झाली.
———————————-
चौकट. हे देवस्थान ३०० फूट खोल दरीत अंबऋषी मंदीर… आमसरी येथील देवस्थान हे ३०० फूट खोल दरीत कोरलेले शिवलिंगाचे भव्य गुफा मंदिर आहे, या मंदिराचा इतिहासिक असल्याचे येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात ,प्राचीन निसर्ग वातावरणात आहे. मंदिरासमोर डोंगरावरून वाहणारा धबधबा आहे. येथे भक्त दर्शनासाठी आल्यावर आनंद व्यक्त करतात, जागृत देवस्थान असल्याने श्रावण सोमवार निमित्त येथे जळगाव, बुलडाणा, औरंगाबाद, शिवणा, मादणी, अजिंठा,आदीसह गाव परिसरातील भक्त दर्शनसाठी येतात. काही दर सोमवारी दाल, बटीचा भंडारा ठेवतात.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button