भुईंज:-गांजा विक्री करणाऱ्या इसमास भुईंज पोलिसांची अटक; १ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) भुईंज:-गांजा विक्री करणाऱ्या इसमास भुईंज पोलिसांची अटक; १ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त.

भुईंज पोलिसांची धडक कारवाई; ₹३७,८०० किमतीचा गांजा हस्तगत.
दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि पृथ्वीराज ताटे यांना गोपनीय माहिती मिळाली की, हनमंत किसन कणसे, रा. आसले, ता. वाई, जि. सातारा हा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे गांजाची बेकायदेशीर विक्री करीत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पुनम झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत हनमंत किसन कणसे याच्या राहत्या घरावर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो ८०० ग्रॅम गांजा, अंदाजे ₹३७,८००/- किमतीचा, जप्त केला असून संबंधित इसमास अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदर कारवाई मा. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा; मा. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा; तसेच मा. सुनील साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये पुनम झगडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक; पृथ्वीराज ताटे, सपोनि; सुरज शिंदे, अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक; शिवाजी तोडरमल, वैभव टकले, सपोफौ; नितीन जाधव, गणेश घोटकर, पोलीस हवालदार; सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते व आकाश कुंभार यांनी सहभाग घेतला.
सदर उल्लेखनीय कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी कारवाईमध्ये सहभागी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
भुईंज पोलिसांकडून अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.
2) पुणे शहर:- बेकायदेशीर अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी बाणेर पोलीस स्टेशन तपास पथकांकडून जेरबंद – १ गावठी पिस्टलसह ०२ जिवंत काडतुसे जप्त.

दिनांक 19/08/2026 रोजी बाणेर पोलीस स्टेशन, तपास पथकातील पोलीस शिपाई 8145 अतुल इंगळे यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, पाटील नगर बालेवाडी येथील मोकळ्या जागेत एक इसम त्याचेकडे अवैध अग्निशस्त्र घेवून येणार आहे. सदर माहिती तात्काळ पोलीस शिपाई 8145 अतुल इंगळे यांनी सपोनि गणेश रायकर व मा.वपोनि सो, चंद्रशेखर सावंत, बाणेर पोलीस स्टेशन यांना दिली.
मा.वपोनि सो, बाणेर पोस्टे यांनी सदर बाबत खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने सदर ठिकाणी सपोनि गणेश रायकर व तपास पथक पोलीस अंमलदारांसह रवाना झाले.
तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथे जावून दबा धरून बसले असता काही वेळातच नमुद ठिकाणी एक इसम आला आणि सदर इसम हा संशयास्पद हालचाली करीत असताना दिसून आला.
तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे त्याचेजवळ जावून त्यास पाटील वस्ती बालेवाडी पुणे येथील मोकळ्या जागेतून ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ओमकार बाबासाहेब जाधव वय 20 वर्षे रा. पारखे वस्ती सुसगाव पुणे असे असल्याचे सांगितले.
सदर इसमाची सपोनि गणेश रायकर यांनी पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला डावीकडे असलेले एक सिल्वर रंगाचे स्टिलचे अग्निशस्त्र व सदर अग्निशस्त्राच्या मॅगझीनमध्ये दोन पितळी जिवंत काडतुसे मिळून आले.
सपोनि गणेश रायकर यांनी सदर इसमास सदर अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का? असे विचारले असता त्याने त्याचेकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगून सदर अग्निशस्त्र त्याचा मित्र नामे नृसिंह बिडवे रा. पारखे वस्ती, सुसगाव पुणे याचेकडून घेतले असल्याचे सांगितले.
लागलीच इसम नामे नृसिंह रामचंद्र बिडवे याचा शोध घेणेकामी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे रवाना झाले असता सदर इसम हा एव्हन व्हिस्टा सोसायटी जवळ बालेवाडी पुणे येथे येत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे एव्हन व्हिस्टा सोसायटी जवळ बालेवाडी पुणे येथे सापळा रचून थांबले असता थोड्याच वेळाने सदर ठिकाणी आरोपी नामे नृसिंह रामचंद्र बिडवे हा आल्याने त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता नृसिंह रामचंद्र बिडवे, वय 25 वर्षे रा. पारखे वस्ती, सुसगाव पुणे असे सांगितले.
नमुद दोन्ही आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपी क्र.01 याचेकडून एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र त्यामध्ये दोन पितळी जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि गणेश रायकर हे स्वतः करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संजय दराडे, पोलीस सहआयुक्त पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. चुलबुला रजनीकांत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर, मा. श्री. ब्रह्मदेव गावडे सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, यांचे सूचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मा. श्री. विजय खिल्लारे, सपोनि गणेश रायकर, पोहवा 2343 गणेश गायकवाड, पोहवा 6701 बाबा आहेर, पोहवा 6674 किसन शिंगे, पोहवा 7356 संदेश निकाळजे, पोहवा 451 शरद राऊत, पोशि 8145 अतुल इंगळे, पोशि 10404 प्रदिप खरात, पोशि 989 गणेश भोईने, पोशि 2441 गजानन अवातिरक, पोशि 2395 स्वप्निल मराठे, पोशि 1346 समीर पवार सर्व नेमणुक बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.
(चंद्रशेखर सावंत)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बाणेर पोलीस ठाणे, पुणे शहर





