आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर:-१० हजार विद्यार्थ्यांसमवेत भव्य नशामुक्ती रॅली; श्रीरामपूर नशामुक्त करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-१० हजार विद्यार्थ्यांसमवेत भव्य नशामुक्ती रॅली; श्रीरामपूर नशामुक्त करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन.

श्रीरामपूर / माळेवाडी (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी) :
श्रीरामपूर शहर पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या पाच दिवसीय ‘नशामुक्त अभियानाचा’ उत्साहात समारोप करण्यात आला. या अभियानाच्या समारोपानिमित्त आर.बी.एन.बी. कॉलेजच्या क्रीडांगणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल १० हजार विद्यार्थी सहभागी झालेल्या भव्य नशामुक्ती रॅलीने श्रीरामपूर शहर दुमदुमून गेले.
शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थी, तरुण तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी नशामुक्तीबाबत जनजागृती केली.
यावेळी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन करताना, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून श्रीरामपूर तालुका नशामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटकाने नशाविरोधी अभियानात सहभागी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी पाहून पालकमंत्री स्वतः रस्त्यावर
नशामुक्ती रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास येताच पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. तसेच या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
या पाच दिवसीय अभियानांतर्गत निबंध, रांगोळी, वक्तृत्व यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या मीनाताई जगधने, आमदार हेमंत ओगले, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे, गटविकास अधिकारी स्मिता निकाळजे, गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामपूर शहर पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या पाच दिवसीय नशामुक्त अभियानाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, विद्यार्थी व तरुणांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरल्याचे मानले जात आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button