ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 2 फलटण बीट तरडगांव ग्रामपंचायत खराडेवाडी येथे मिशन धाराऊ उद्घाटन कार्यक्रम सोहळा संपन्न.

प्रतिनिधी:- शुभम भापकर फलटण :-7972521412

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 2 फलटण बीट तरडगांव ग्रामपंचायत खराडेवाडी येथे मिशन धाराऊ उद्घाटन कार्यक्रम सोहळा संपन्न.

प्रतिनिधी. शुभम भापकर

फलटण. खराडेवाडी येथे सातारा जिल्हा परिषद मार्फत मिशन धाराऊ ही चळवळ राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रम १ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत खराडेवाडी येथे अंगणवाडी मार्फत राबविण्यात आली . यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी खराडेवाडी गावचे विद्यमान सरपंच कुसुम गणपतराव खराडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व प्रतिमेचे पूजन गरोदर माता पुनम सागर टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शन अंगणवाडी सेविका सौ शुभदा दीक्षित मॅडम स्तनपान विषयी मार्गदर्शन करताना गरोदर माता यांना आई चे दुध हे अमृत असल्याने त्यांचे महत्व लोक चळवळीच्या माध्यमातून समाजातील घराघरापर्यंत पोहचले पाहिजे असे सांगण्यात आले व शाकिरा पठाण यांनी देखील गरोदर माता यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी मदतनीस मुमताज आतार यांनी केले.यावेळी अंगणवाडी मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास खराडेवाडीतील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या कार्यक्रमास शोभा वाढवली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button