कराड:-श्री समर्थ हायस्कूल, कालगाव येथे विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-श्री समर्थ हायस्कूल, कालगाव येथे विद्यार्थ्यांची वार्षिक आरोग्य तपासणी.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी; राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कालगावमध्ये आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न!
कालगाव (प्रतिनिधी) : श्री समर्थ हायस्कूल, कालगाव येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात कॉटेज हॉस्पिटल, कराड येथील डॉ. प्रेरणा जाधव व डॉ. रोहित शिंदे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आहार, सकस व संतुलित आहाराचे महत्त्व, आरोग्याची काळजी तसेच विविध आजारांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले. तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच हृदयरोग, हर्निया, डोळ्यांचे विकार यांसह विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देण्यात आली.
तपासणीमध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ आरोग्यविषयक दोष आढळून आले. संबंधित विद्यार्थ्यांना पुढील आवश्यक तपासणी व उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वेळीच निदर्शनास येण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चव्हाण होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री. इन्नूस ढालाईत, श्री. सिकंदर चव्हाण, श्री. गमरे सर, सौ. मेरकरी मॅडम, श्री. शिरतोडे सर, सौ. बाबर मॅडम, लेखनिक सौ. पाटील मॅडम, श्री. शिरसागर, श्री. वाघमारे, श्री. काटकर, श्री. दस्तगीर मुलाणी तसेच विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होत असल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे.





