श्रीरामपूर माळेवाडी :-भागीरथी माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) श्रीरामपूर माळेवाडी :-भागीरथी माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रातिनिधी )विश्वात्मा शिक्षण प्रसारण मंडळ छत्रपती संभाजी नगर संचलित भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य श्री बी एम हजारे सर व प्रमुख पाहुणे म्हणून मा . सूरज राजू जारवाल एस आर धुळे मा रमेश त्रिभुवन उप सरपंच नालेगाव मा . योगेश वैष्णव मा . संजनदादा शिंदे मा . विठ्ठल काकडे ‘ मा . योगेश वैष्णव पोलीस पाटील नालेगाव मा . दत्तात्रेय सुरासे संचालक मा . आदित्य कटारे ग्रामसेवक नालेगाव संदीप त्रिभुवन मधुकर त्रिभुवन श्रीमती मंजुषा सुरासे अधिक्षिका बबनराव ढोकणे विद्यार्थी वसतिगृह नालेगाव आदी उपस्थित होते याप्रसंगी संविधान प्रस्ताविकचे वाचन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री सुरज साळवे सर यांनी प्रास्ताविक केले प्राचार्य श्री बी एम हजारे सरांनी स्वातंत्र्यदिनाची माहिती व स्वातंत्र्यविरांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी एन पठारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा उभेदळ मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत निंबाळकर सुनील भवर ‘ प्रमोद चव्हाण , राजेश्वर विभुते , गणेश जगताप , प्रमोद रिंढे ‘ प्रविण जाधव , भारत भोपळे ‘ सागर राजपूत ‘ रोहिदास त्रिभूवन ‘ गंगाधर कटारे ‘ योगेश शिंदे ‘ गोकुळ पवार , श्रीमती निर्मला सपकाळ , मॅडम ‘ श्रीमती जयश्री बोर्डे , मोहिनी अनवडे मॅडम , समाधान सुरासे , मंगेश दुतोंडे ‘ किशोर साळुंखे ‘ सुनील बोडखे , ज्ञानदेव , अमोल त्रिभूवन , उत्तम सरोवर ‘ विशाल साबळे , ज्ञानदेव तायडे आदींचे सहकार्य लाभले
2) श्रीरामपुर तालुक्यातील माळेवाडी गावाचे सुपुत्र देवेंद्र औताडे यांना आज भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मध्ये वायु सैनिकांच्या यशाबद्दल शौर्य पदक देऊन केला सन्मान.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RpS स्टार न्युज प्रतिनिधी ) माळेवाडीच्या सुपुत्राचा देशसेवेचा गौरव.
ऑपरेशन सिंदूरमधील वायू सेनेच्या यशाबद्दल देवेंद्र औताडे यांचा भारत सरकारकडून शौर्य सन्मान
श्रीरामपुर तालुक्यातील माळेवाडी गावचे सुपुत्र देवेंद्र औताडे यांचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२६ या प्रसंगी भारत सरकारतर्फे ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय वायूसेनेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शौर्य सन्मान देऊन गौरव करण्यात आला . देशसेवेत बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेबद्दल मिळालेल्या या सन्मानामुळे माळेवाडी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे
देवेंद्र औताडे यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल माळेवाडी ग्रामस्थ नातेवाईक आणि परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
देशाच्या या शुरवीराचा आम्हा सर्वाना अभिमान आहे
3) श्रीरामपूर:-अदानी हटवा शिवजन्मभूमी वाचवा अदानी हटवा सह्याद्री वाचवा.

श्रीरामपुर / माळेवाडी ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) अदानी हटवा शिवजन्मभूमी वाचवा ‘ अदानी हटवा सह्याद्री वाशिम असे घोषवाक्य घेऊन सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ वाजगे यांचे ९ ऑगस्ट पासून उपोषण सुरू ठेवले आहे.

शिवजन्मभूमी जुन्नर येथे आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणारा अदानीच्या प्रकल्प आणि बेकायदेशीर जन सुनावणी विरोधात सामान्य माणसाला नाराजी पहायला मिळत आहे अदानी प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकार विरोधात सामान्य माणूस मोठे आंदोलन उभं राहण्याची चिन्हे आज दिसत आले
उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ वाजगे यांना प्रशासनाने जबरदस्तीने उपोषण सोडण्यासाठी रुग्णालयात दाखल केले जुन्नर आणि पंचकोशीतील सर्व कार्यकर्ते अदानी प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकार विरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र आले आहेत प्रमुख कार्यकर्ते ज्ञानेश्वर बुधा डामसे , उमेश विश्वनाथ विरणकर ‘ मुकेश रूपाजी गवळी , अनिल दामु सुपे , दिनकर किसन मेमनि , संदिप डामसे ‘ सतिश सुपे ‘विनायक मोहन आदी कार्यकर्ते इत्यादी





