मायणीच्या अनंत इंग्लिश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणीच्या अनंत इंग्लिश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

मायणी प्रतिनिधी—–मायणी येथील स्फूर्ती शिक्षण मंडळ संचलित अनंतइंग्लिश स्कूल व हुतात्मा भगतसिंग प्रशालेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी संपूर्ण गावातून ढोल लेझीम व वाद्याच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व विद्यार्थी प्रशालेच्या प्रांगणात जमल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य गंगाराम सुगदरे यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर तर जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा प्रकारे घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला त्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत प्रकार दाखवून उपस्थितांची वाहवा मिळवली यावेळी नीलम वाघमोडे यांनी नशा मुक्ती भारत, असाक्षर, व भेसळयुक्त अन्न याविषयी शपथ दिली त्यानंतर झालेल्या भाषणात डॉक्टर येळगावकर यांनी भारतीय स्वातंत्र्य हे त्यागाचे, बलिदानाचे, शौर्याचे प्रतीक असून प्रत्येकाने स्वातंत्र्य विषयी अभिमान बाळगला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी व नवयुकांनी जिद्द ,मेहनत, कष्ट आणि अभ्यासाला महत्त्व देऊन आपला देश सुजलाम सुफलाम कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले यावेळी इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक व रोख बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी यशोदीप सोसायटीचे चेअरमन व संचालक मातोश्री सरू ताई चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक, कार्याध्यक्ष राजाराम कचरे, जालिंदर माळी, जनार्दन देशमुख, आनंदराव शेवाळे, सौ पल्लवी गुदगे सौ डॉक्टर उर्मिला येळगावकर, रामदास कदम, अभिजीत काबुगडे, आप्पा भिसे, मोहन चन्ने, विठ्ठल शिंदे विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी शेखर देशमुखे यांनी आभार मानले.


RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



