आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-मेडिकल फोडणारा पोलिसांच्या जाळ्यात; वाईत २४ तासांत आरोपीला बेड्या – पोलिसांची चाहूल लागताच पळ काढला; पाठलाग करून घेतले ताब्यात, हातोडी-पक्कड जप्त.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-मेडिकल फोडणारा पोलिसांच्या जाळ्यात; वाईत २४ तासांत आरोपीला बेड्या – पोलिसांची चाहूल लागताच पळ काढला; पाठलाग करून घेतले ताब्यात, हातोडी-पक्कड जप्त.

वाई | दि. १६ : मेडिकलमध्ये चोरी करून पसार झालेल्या संशयिताला वाई पोलिसांनी चोवीस तासांच्या आत शोधून काढत बेड्या ठोकल्या. कैलास विष्णू कदम (वय ३४, रा. मालतपूर, पसरणी, ता. वाई) असे पोलिसांच्या ताब्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. चोरीसाठी वापरलेली हातोडी आणि पक्कड त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणातील अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
वाई शहरातील मेडिकलमध्ये चोरी झाल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल झाली. गुन्ह्याची नोंद होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपीचा माग काढण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील विविध भागांत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीतून संशयित गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी परिसरात असल्याचे समोर आले. माहितीची खातरजमा करत पथकाने परिसर गाठला.
पोलिसांना पाहताच संशयिताने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडले. चौकशीत त्याची ओळख कैलास कदम अशी पटली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता मेडिकल चोरीप्रकरणी त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अंगझडती घेतली असता चोरीसाठी वापरलेली हातोडी आणि पक्कड सापडली. दोन्ही साहित्य पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतले आहे. या चोरीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच चोरीचा अन्य मुद्देमाल कुठे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस हवालदार लेंभे तसेच विक्रम धोत्रे, नितीन कदम, हेमंत शिंदे आणि विशाल शिंदे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार लेंभे करीत आहेत.

2) वाई:-देशभक्तीचा गजर; आरपीआय (A)कडून वाईकरांना फरसाण-जिलेबीचा गोडवा.

संतोष जाधव मित्र परिवाराचा पुढाकार; नगराध्यक्ष अनिल सावंत यांची उपस्थिती.
वाई | दि. १६ : तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि संतोष दादा जाधव मित्र परिवाराच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांना फरसाण व जिलेबीचे वाटप करण्यात आले. सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या उपक्रमाला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सव न राहता समाजातील बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक घट्ट करणारा दिवस ठरावा, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपुलकीने फरसाण-जिलेबीचे वाटप केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन उपक्रमात सहभाग घेतला. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमास आरपीआय (A)चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष जाधव, वाई तालुकाध्यक्ष अजीम इनामदार, युवक तालुकाध्यक्ष अजय गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष सुभाष भिसे, तालुका उपाध्यक्ष महेश मोरे यांच्यासह रोहित पवार, सचिन पाटणे, संदीप जाधव, अश्रफ शेख, बबलू मोमीन, जय शिंदे, सागर कोळी, सायली कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देशभक्तीचा उत्साह, सामाजिक सलोखा आणि नागरिकांशी आपलेपणाचा संवाद या त्रिसूत्रीवर झालेल्या या उपक्रमाने स्वातंत्र्यदिनाच्या आनंदात आणखी भर घातली.

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button