नागठाणे:-युवा नेतृत्व असणारे श्री संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे:-युवा नेतृत्व असणारे श्री संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

नागठाणे : नागठाणे पंचायत समिती गणाचे विद्यमान सदस्य, युवा संघटक व कुशल नेतृत्व मा. श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील यांचा ५० वा वाढदिवस गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा व सत्कार न करता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता ग्रामदैवत आई चौंडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन करण्यात आली.
त्यानंतर सकाळी ८ वाजता ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागठाणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
तसेच सकाळी १० वाजता पशुवैद्यकीय दवाखाना, नागठाणे येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमधून शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम तयार झाला होता
या सर्व कार्यक्रमांना नागठाणे पंचायत समिती गणातील समस्त ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती व सर्वांनी मिळुन पंचायत समिती विद्यमान सदस्य श्री.संतोष साळुंखे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! देण्यात आल्या.


RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



