सोलापूर:-महिला अन् ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी ‘WOW’ संघटनेचा दिलासा; कुमठा नाका येथे NCMC स्मार्ट कार्डचे वाटप!
पत्रकार संगीता फाळके पुणे शहर महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सोलापूर:-महिला अन् ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी ‘WOW’ संघटनेचा दिलासा; कुमठा नाका येथे NCMC स्मार्ट कार्डचे वाटप!

महिला प्रतिनिधी – संगीता फाळके
सोलापूर शहरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा एसटी प्रवास अधिक सुलभ व सुखकर व्हावा, या उद्देशाने ‘WOW’ संघटनेच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्या लोलगे यांनी आयोजित केलेल्या या शिबिराचे उदघाटन सोलापूर महापालिका चे सहाय्यक आयुक्त मा विनोद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री हाजीमलंग नदाफ तसेच मौलाना आर्थिक विकास महामंडळ चे माजी व्यवस्थापक श्री C.A बिराजदार, सायरा शेख,तात्यासाहेब भोसले उपस्थिती होते.कुमठा नाका परिसरात पार पडलेल्या या शिबिरात लाभार्थ्यांना राष्ट्रीय डिजिटल प्रवास योजनेअंतर्गत ‘NCMC’ (National Common Mobility Card) स्मार्ट प्रवासी कार्ड्सचे चे यशस्वी वाटप करण्यात आले. एसटी बस प्रवासात मिळणाऱ्या विविध शासकीय सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे डिजिटल कार्ड अत्यंत महत्त्वाचे असल्याने, डिजिटल प्रक्रियेची फारशी माहिती नसलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
🌹या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘WOW’ संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई लोलगे यांच्या नेतृत्वाखाली WOW ( वाव ) च्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मारता आसादे, वैशाली देशपांडे,लक्ष्मी माने,शारदा मसुदी, स्वाती जाधव, शबाना मुलाणी , पुष्पा हलकुडे,यशोदा सोनावणे,गौरा कोरे यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणाऱ्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.




