सातारा:-काळी-पिवळी टॅक्सी चालक-मालकांना काही महिन्यांची मुदत; API राजेंद्र माने यांची सकारात्मक भूमिका.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-काळी-पिवळी टॅक्सी चालक-मालकांना काही महिन्यांची मुदत; API राजेंद्र माने यांची सकारात्मक भूमिका.

सातारा:- सातारा जिल्हा वाहतूक शाखेचे API श्री. राजेंद्र माने, श्री. योगेश जाधव व श्री. विशाल नलावडे यांच्या समन्वयातून सातारा जिल्ह्यातील काळी-पिवळी टॅक्सी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस *सातारा जिल्हा टॅक्सी वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर जगन्नाथ साळुंखे* यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा, भुईंज, वाठार, कोरेगाव, रहिमतपूर आदी ठिकाणच्या काळी-पिवळी टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी तसेच चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी API राजेंद्र माने साहेब यांनी टॅक्सी वाहतूक व्यवस्था, वाहनांची कागदपत्रे, वाहतूक नियमांचे पालन तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष शंकर जगन्नाथ साळुंखे यांनी, “वाहतूक शाखेने केलेल्या सूचनांचे संघटनेच्या वतीने निश्चितपणे पालन करण्यात येईल. त्यासाठी चालक-मालकांना आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांची मुदत द्यावी,” अशी विनंती केली.
या विनंतीला API राजेंद्र माने यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चालक-मालकांना आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी काही महिन्यांची मुदत देण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे जिल्ह्यातील काळी-पिवळी टॅक्सी चालक-मालकांना दिलासा मिळाला आहे.
या बैठकीत वाहतूक नियमांचे पालन करून प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत सेवा देण्याचा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील विविध काळी-पिवळी टॅक्सी वाहतूक संघटनांचे पदाधिकारी, चालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




