ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रहारचे अभिजीत कालेकर अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी साकुरी गटातून उमेदवारी करणार.
प्रतिनिधी:- वसंत काळे अहमदनगर :-9767653309

- बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार पक्षाचे अहमदनगर जिल्हा संघटक श्री.अभिजीत कालेकर अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी साकुरी गटातून उमेदवारी करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.या उमेदवारीमुळे प्रहार पदाधिकार्यांमद्धे अतिशय उत्साहाचे वातावरण.साकुरी गटात दोन पेक्षा अधिक उमेदवार असल्यामुळे लोकांना चांगले कामे कोण करु शकत हा विचार करुन मतदान करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असल्यामूळे लोकांमधे आनंदाचे वातावरण तयार होणार आहे.व त्यामूळे लोकांना नविन पर्याय उपलब्ध होणार आहे.प्रहार पुर्ण ताकतीने फक्त लोकांच्या मनात कामे करण्याची भावना समोर ठेउन या निवडणूकीत उतरणार आहे.आतापर्यंत जो निवडून येतो तो नंतर गायब होतो अशी परिस्थिती साकुरी गटात तयार झाली आहे.याला कुठेतरी या उमेदवारीमुळे ब्रेक लागू शकतो.व बच्चूकडू हे सामान्य माणसांची कामे कसे करतात हे सामान्य जनतेला चांगलेच माहित आहे.त्यामूळे प्रहारला निश्चितच फायदा होईल.