क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
कोल्हापूर:-अष्टपैलू खेळाडू उमेश चोरेगे यांचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कोल्हापूर:-अष्टपैलू खेळाडू उमेश चोरेगे यांचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी!

मधुरीमराजे यांच्या हस्ते ‘सूर्यास्त’ जीवनचरित्राचे लोकार्पण; फुटबॉलमय वातावरणात आठवणींना उजाळा.
कोल्हापूर | प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीत संयम ठेवून, अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन करता येते, हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून देणारे अष्टपैलू खेळाडू उमेश चोरेगे यांचे जीवनकार्य आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला अध्यक्षा मधुरीमराजे यांनी केले.
ज्येष्ठ फुटबॉलपटू कै.उमेश चोरेगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. प्रियदर्शनी चोरेगे लिखित ‘सूर्यास्त’ या जीवनचरित्राचे लोकार्पण करण्यात आले. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवरील कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला मधुरीमराजे यांच्यासह ‘केएसए’चे उपाध्यक्ष अरुण नरके, बाळ निचिते, सचिव माणिक मंडलिक, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
🏆 फुटबॉलच्या मैदानापासून प्रेरणादायी जीवनप्रवासापर्यंत…
उमेश चोरेगे यांनी फुटबॉल क्षेत्रात केलेले उल्लेखनीय योगदान आणि त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास नव्या पिढीसमोर यावा, या उद्देशाने ‘सूर्यास्त’ हे पुस्तक साकारण्यात आले आहे. त्यांच्या कर्तृत्वाची, व्यक्तिमत्त्वाची आणि फुटबॉल क्षेत्रातील योगदानाची आठवण या निमित्ताने जागवण्यात आली.
कार्यक्रमात डॉ.प्रकाश शिंदे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ लेखक मोहन हवालदार आणि कवयित्री निलांबरी कुलकर्णी यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
📖 ‘सूर्यास्त’मधून उमेश चोरेगे यांच्या आठवणींना उजाळा
पुस्तकातील बालक्रीडाविषयीची माहिती देताना मुलगा वीरधवल चोरे यांनी तीन पिढ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल,असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी हुळे यांनी केले. सूत्रसंचालन मनीष आपटे यांनी केले, तर अभिजित चोरेगे यांनी आभार मानले.
⚽ फुटबॉलमय वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा!
कार्यक्रमस्थळी कोल्हापूरातील जुन्या संघांचे सिबिल व नाव असणारे गोलाकार पाट्या तसेच पांढऱ्या-काळ्या-पिवळ्या रंगांच्या पताका लावण्यात आल्या होत्या.उमेश चोरेगे यांच्या प्रतिमेच्या दुहेरी बाजूस त्यांच्या संघाचे टी-शर्ट लावण्यात आले होते.
कार्यक्रमास फुटबॉल क्षेत्रातील ज्येष्ठ खेळाडू, प्रशिक्षक, पंच तसेच आजी-माजी फुटबॉलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात जुन्या फुटबॉल आठवणींना उजाळा मिळाला आणि वातावरण अक्षरशः फुटबॉलमय झाले.
“मैदानावरचा खेळाडू काळाच्या पडद्याआड गेला; पण त्याचा संघर्ष, कर्तृत्व आणि प्रेरणा आजही नव्या पिढीच्या मनात जिवंत आहे!”




