ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मायणीत तीव्र निषेध; प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) खटाव:-संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मायणीत तीव्र निषेध; प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

मायणी | प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्याच्या निषेधार्थ मायणी येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला, तसेच जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
मायणी येथील चांदणी चौक परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर आणि जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी भाषेचे भान राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, डॉ. दिलीप येळगावकर युवा मंचचे कार्यकर्ते, तसेच मायणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि अशा प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थितांनी राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर अश्लील किंवा अवमानकारक भाषा वापरणे अयोग्य असल्याचे नमूद करत, भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत, अशी मागणी केली. आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या निषेध आंदोलनामुळे मायणी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

2) मायणी:-ना.जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून गारळेवाडी सिद्धनाथ देवस्थानास ब वर्ग दर्जा प्राप्त – ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याबद्दल गावात आनंदी वातावरण.

मायणी प्रतिनिधी——- – गजीनृत्य सादर करुन आनंद व्यक्त करताना गारळेवाडीचे ग्रामस्थ( ना.जयकुमार गोरे व टी .आर. गारळे यांचेही फोटो लावावेत) श्री सिद्धनाथांच्या कृपेने मा. ना.जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वातून आणि टी.आर. गारळे साहेब यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे श्री सिद्धनाथ देवस्थान गारळेवाडी या पवित्र मंदिरास तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त झाला.दिनांक३१जुलै२०२६रोजी मा. ना. जयकुमार गोरे साहेबांनी गारळेवाडीवरील विशेष प्रेम,,श्रद्धा आणि जिव्हाळा व्यक्त करत श्री सिद्धनाथ मंदिर व मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल पाच कोटींचा निधी एकरकमी मंजूर केला आहे.याबद्दल गजिनृत्य करुन ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला.तसेच मारुतीशेठ गारळे,पोलीस पाटील धनाजी गारळे, सरपंच अनिल गारळे,माजी सरपंच पोपट गारळे,संतोष उर्फ बाबुराव गारळे,प्रल्हाद मदने व समस्त ग्रामस्थ यांनी सिद्धनाथाला श्रीफळ वाढविले व आनंद व्यक्त केला.मारुतीशेठ गारळे यांनी ही रक्कम कोणत्या खर्चासाठी आहे ते स्पष्ट केले. राज्यात अनेक प्रसिद्ध व मोठी देवस्थाने आहेत,त्यापैकी काही देवस्थानांना अद्याप तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा मिळालेला नाही.अवघ्या सुमारे एक हजार लोकसंख्या असलेल्या गारळेवाडी सारख्या छोट्या गावासाठी एवढा मोठा निधी मंजूर होणे ही अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब आहे.गारळेवाडीच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे टी.आर. गारळे साहेब आणि गावावर विशेष प्रेम दाखवत प्रत्येक वेळी भरीव निधी मंजूर करणारे ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांचे गारळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने यावेळी जाहीर आभार मानण्यात आले व धन्यवाद देण्यात आले. यावेळी प्रतिक्रिया देताना टी.आर. गारळे म्हणाले,श्री सिद्धनाथ देव हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो.खटाव,आटपाडी,खानापूर या तिन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर वसलेले गारळेवाडी गावचे ग्रामदैवत असून याठिकाणी पूर्वाभिमुखी हेमाडपंथी मोठे मंदिर आहे.या देवस्थानास सन २०११मध्ये क वर्ग देवस्थान दर्जा देण्यात आला होता.त्यामधून ९०लक्ष रुपयांपर्यंतची लहान सहान कामे झालेली आहेत.तथापि देवस्थानचे जागृत महत्त्व, वाढणारी भाविकांची संख्या, व मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन ना.जयकुमार गोरे (भाऊ ) यांनी देवस्थानास याच वर्षात ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिला.त्यानुषंगाने ग्रामस्थांची मागणी व गरजेनुसार पाच कोटी इतक्या रकमेच्या कामाना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.याबद्दल ग्रामस्थ गारळेवाडी व परिसरातून येणाऱ्या भक्तांकडून ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांना हृदयपूर्वक धन्यवाद देण्यात येत आहेत.श्री सिद्धनाथाच्या कृपा आशीर्वादाने ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांची पुढील वाटचाल निश्चितच दैदिप्यमान होईल अशी प्रार्थना गारळे साहेब यांनी केली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button