पारनेर:-जिल्हापरिषद शाळा राजणगाव येथील विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप!.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-जिल्हापरिषद शाळा राजणगाव येथील विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप!.

(पारनेर, सुपा -राजकुमार इकङे)
रांजणगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
कै. काशिनाथ गाढवे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गाढवे कुटुंबाचा सामाजिक उपक्रम
रांजणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कै. काशिनाथ शंकरराव गाढवे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. गाढवे कुटुंबाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मदतीचा हात मिळावा आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने गाढवे परिवाराकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
याप्रसंगी गाढवे कुटुंबातील श्रीमती लताबाई गाढवे, विक्रम गाढवे, कुलदीप गाढवे, भाग्यश्री गाढवे आणि मोहिनी गाढवे ,सुरेशजी येणारे प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आणि शिक्षणाप्रती आदर भाव ठेवून नेहमीच मदतीचा हात पुढे करणाऱ्या गाढवे परिवाराचे शाळेच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना असणे, उपशिक्षक श्री. पठारे संदीप आणि उपशिक्षिका श्रीमती रूपाली गंधाडे यांनी गाढवे कुटुंबाचे आभार मानले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




