पुणे:-सराईत आरोपीकडुन १ तीन चाकी रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त – भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-सराईत आरोपीकडुन १ तीन चाकी रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त – भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटोल यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना एक इसम चोरीची रिक्षा घेवुन सीएनजी पेट्रोल पंपालगत, सरहद्द चौक, पुणे येथे थांवला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.
त्याप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार हे सीएनजी पेट्रोल पंपालगत, सरहद्द चौक, पुणे येथे गेले असता तेथे आरोपी नामे चेतन राजु जाधव, वय २६ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०९, सुरज दर्शन सोसायटी, राजगड व्हिलाजवळ, आंबेगाव पठार, पुणे हा तीनचाकी रिक्षा तिचा नंबर MH12FC2270 हिच्यासह मिळुन आला. त्यावावत खात्री करता त्याने सदरची रिक्षा त्याचे साथीदारांसह चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने ती जप्त करण्यात आली. नमुद आरोपीकडे अधिक केले तपासामध्ये त्याचेकडुन होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२.एस.जे ५१२४ ही जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील खालील प्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्र
१
गुरनं
कलम
३४२/२०२६
भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)
जप्त वाहन
किंमत
रिक्षा तिचा नंबर
१,५०,०००/-
३४३/२०२६
, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)
MH12FC2270 युनिकॉर्न दुचाकी गाडी
२
१,००,०००/-
MH12SJ5124
एकुण – २,५०,०००/- रुपयांची तीन वाहने
जप्त करण्यात आली आहे
नमुद आरोपी हा खालीलप्रमाणे ३ गुन्हयामध्ये पाहीजे होता. त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गुरनं अ.क्र
३१८/२०२६
कलम
भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)
१
२
३१९/२०२६,
भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)
३
४७४/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)
सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चोधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.
(मानसिंग पाटील) वरीष्ठ पोलीस निरीक्षक
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर




