शिरूर:-सर्वज्ञ प्रतिष्ठानचा १७ वा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात; विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
पत्रकार सार्थक काळे पारनेर तालुका कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूर:-सर्वज्ञ प्रतिष्ठानचा १७ वा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात; विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन.

शिरूर येथील बाबुराव नगर, शुभंकर चौक येथे ‘सर्वज्ञ प्रतिष्ठान’च्या वतीने यंदा १७ व्या वर्षाचा सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा कार्यक्रमांच्या धडाक्यात साजरा केला जाणार आहे.
प्रतिष्ठापना सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली असून, उत्सवाच्या कालावधीत नागरिकांसाठी व लहान मुलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
सकाळची आरती 9 वाजता
सोमवार (१४/०९/२०२६): श्रींची स्थापना
मंगळवार (१५/०९/२०२६): संगीत खुर्ची स्पर्धा
बुधवार (१६/०९/२०२६): ‘होम मिनिस्टर’ खेळ
गुरूवार (१७/०९/२०२६): चमचा लिंबू स्पर्धा
शुक्रवार (१८/०९/२०२६): सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद वितरण
शनिवार (१९/०९/२०२६): डान्स स्पर्धा (लहान गट)
रविवार (२०/०९/२०२६): डान्स स्पर्धा (मोठा गट)
सोमवार (२१/०९/२०२६): वक्तृत्व स्पर्धा
मंगळवार (२२/०९/२०२६): प्रसिद्ध जादूगार हनिफ यांचे जादूचे प्रयोग
बुधवार (२३/०९/२०२६): स्लो सायकलिंग स्पर्धा
गुरूवार (२४/०९/२०२६): गुणवंत व विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा
शुक्रवार (२५/०९/२०२६): भव्य विसर्जन मिरवणूक
उत्सवाच्या काळात दररोज सकाळी 12 वाजता आणि रात्री 7 वाजता श्रींची महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या वतीने बाबुराव नगर परिसरातील व शिरूर शहरातील सर्व गणेशभक्तांना या विविध कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे, तसेच उपस्थित राहण्याचे हार्दिक आवाहन करण्यात आले आहे.



