आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-आ.अतुलबाबांच्या पुढाकारातून ९२१ जणांना मिळणार जगण्याचा आधार!

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717484

कराड:-आ.अतुलबाबांच्या पुढाकारातून ९२१ जणांना मिळणार जगण्याचा आधार!


कुणाला व्हीलचेअर, कुणाला श्रवणयंत्र; ८०.७८ लाखांचे सहाय्यभूत साहित्य मोफत वाटप.

कराड :-कुणाच्या हालचालींना व्हीलचेअरचा आधार मिळणार, तर कुणाच्या जगण्याला श्रवणयंत्राची साथ मिळणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विशेष उपक्रमातून कराड तालुक्यातील तब्बल ९२१ पात्र लाभार्थ्यांना विविध प्रकारचे सहाय्यभूत साहित्य मोफत मिळणार आहे.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनेंतर्गत, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकाराने दि. १ ते ३ जुलैदरम्यान कोयना वसाहत येथे तपासणी शिबिर घेण्यात आले होते.


या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी ९२१ जण पात्र ठरले असून, त्यांच्यासाठी तब्बल ८०.७८ लाख रुपयांचे सहाय्यभूत साहित्य मंजूर झाले आहे. या साहित्याचे लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
*आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले :*
*“दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. गरजू लाभार्थ्यांना आवश्यक सहाय्यभूत साहित्य मोफत उपलब्ध करून देत त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”*
या उपक्रमामुळे गरजू दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्यासाठी मोठी मदत मिळणार असून, त्यांना अधिक स्वावलंबी होण्यास हातभार लागणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी पाचवड फाटा येथील आनंद मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी १० वाजता निःशुल्क सहाय्यभूत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
या साहित्यामध्ये व्हीलचेअर, कमोडसह व्हीलचेअर, काठी, श्रवणयंत्र, कंबरपट्टा, गुडघ्याचा पट्टा, नेक बेल्ट, स्मार्टफोन, पाठीचा पट्टा आणि कमोड चेअर आदी साहित्याचा समावेश आहे.
पात्र लाभार्थ्यांनी शिबिरास येताना मूळ आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिव्यांगांना स्वावलंबन आणि ज्येष्ठांना सन्मान देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button