कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेवाडी:-दूध व्यवसायाला शेतीपूरक दर्जा न देता मुख्य व्यवसायाचा दर्जा द्या.- जिल्हाध्यक्ष औताडे

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 माळेवाडी:-दूध व्यवसायाला शेतीपूरक दर्जा न देता मुख्य व्यवसायाचा दर्जा द्या.- जिल्हाध्यक्ष औताडे

माळेवाडी ( RPS स्टार न्यूज प्रतिनिधी )
प्रोग्रेसिव्ह ब्रिडर फार्मर असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोणी येथे डॉ अजुंशा शर्मा Dairy Farm Consultant, Punjab. यांच दुधाळ गायीच गाभण काळ ते पिक मिल्क काळाचे नियोजन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . यावेळी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने दूध व्यवसायात हस्तक्षेप करून प्रति लिटर ५/- रुपये अनुदान व ३.५ फॅट ८.५ एस एन एफ च्या दुधास ३०/-रुपये प्रति लिटर भाव देण्यास शासनास भाग पाडले. या कामाची दूध उत्पादकांनी शेतकरी संघटनेची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांचा सत्कार करण्यात आला .
सदर कार्यक्रमासाठी PBFA महाराष्ट्र राज्यचे चेअरमन श्री . निलेश दहे अध्यक्षस्थानी तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष हनुमान पेचे होते , महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव रामनाथ वदक साहेब.तसेच संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री जयंत ताकते , श्री बाबासाहेब पवार , अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री . जयराम खपके , उपाध्यक्ष श्री . समिर रोकडे , श्री . धनंजय जाधव , श्री ‘ रवी हासे , श्री . मानिक पांडे , श्री . नितीन बोरुडे , श्री . गणेश अंतरे श्री . अमोल नागरे चि . प्रतिक डोखे , चि . अशोक सिनारे . चि . अमोल खर्डे चि . श्रीकृष्णा मांढरे , सातारा , सांगली , पुणे , सोलापूर ‘ धारशिव ‘ बीड जिल्ह्यातील PBFA कार्यकारीणी सदस्य ,तसेच मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या .
प्रसंगी आपल्या प्रमुख भाषणातऔताडे म्हणाले की, राज्य सरकारने दूध व्यवसायाला शेतीपूरक व्यवसायाचा दर्जा न देता शेती व्यवसायाचा दर्जा देऊन वाढत्या महागाईच्या निर्देशानुसार दूध दर ठरविणे गरजेचे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शासनाने फक्त पीक कर्जाचा समावेश केलेला असून यामध्ये दूध उत्पादकांनी दूध व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश नसल्याने दूध उत्पादकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने दूध व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा ही विचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राज्यात व देशात होत असलेली दुधाची भेसळ थांबविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही काम करण्यासाठी पाठबळ व संरक्षण देणे गरजेचे आहे. आज रोजी मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांनी दूध भेसळ थांबवणे कामी मोठे योगदान दिले त्यामुळेच दूध उत्पादकांना आज दिलासा मिळत आहे अन्यथा दूध भेसळीला लगाम लागला नसता तर दुधाचे दर किमान दहा रुपयांनी गडगडले असते. या बाबींचा मोठा आर्थिक परिणाम दूध उत्पादकांना सहन करावा लागला असता. दूध भेसळीबरोबरच पशुखाद्यांच्या दर्जे बाबतही कंपन्यांवर बंधने असायला हवी. भविष्यात शंभर टक्के दूध भेसळ रोखन्यास यश मिळाले तर दुधाचे दर आपोआपच ६० ते ७०/-रुपये प्रति लिटर होऊन जनतेला स्वच्छ व भेसळ मुक्त दूध मिळेल. दोन वर्षांपूर्वी झालेल्या दूध आंदोलनात शेतकरी संघटनेने दूध दराबरोबरच दूध भेसळीची ही भूमिका मांडली होती. राज्यात दोन वर्षांपूर्वी झालेले दूध आंदोलन माननीय रघुनाथ दादा पाटील, अँड. अजित काळे, कालिदास आपेट, शिवाजी नांदखेले, पांडुरंग रायते यांनी अहिल्यानगर जिल्ह्यानंतर राज्यात विषय उचलून धरल्याने तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दखल घेत दूध उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले असेही आपल्या समारोप पर मनोगतामध्ये औताडे यांनी म्हटले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button