ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला.
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

मायणी परिसरात मेघगर्जनीसह पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला मायणी प्रतिनिधी__मायणी परिसरात मेघगर्जनेसह आज शनिवारी दुपारी एक वाजता मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे येथील प्रगतशील शेतकरी विलास यलमर यांनी सांगितले की जून महिन्यात पाऊस न झाल्याने पेरण्या रखडलेल्या होत्या परंतु जुलै महिन्यात झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या परंतु पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी अवस्था निर्माण झालेली होती पिकांची स्थिती दयनीय झालेली होती परंतु वरूण राजाने कृपा केल्याने चांगला पाऊस झाल्यामुळे आता पिकाची स्थिती उत्तम राहील एवढ्या पावसावर घेवडा उडीद सोयाबीन यांना शेंगा लागतील त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत निश्चित होईल असे त्यांनी सांगितले