माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश चव्हाण यांचा फलटण तालुका शिवसेनेत जाहीर प्रवेश.
प्रतिनिधी :-अशितोष चव्हाण:-8208717483

*माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश चव्हाण यांचा फलटण तालुका शिवसेनेत जाहीर प्रवेश*
फलटण तालुक्यातील झिरपवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय श्री. सतीश चव्हाण यांनी फलटण तालुका शिवसेनेत आज दिनांक 28/07/2022 रोजी जाहीर प्रवेश केला. फलटण तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शिवबंधन बांधुन व भगवा झेंडा हातात घेऊन सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसैनिकांकडुन फलटण तालुका शिवसेना परिवारात त्यांचे स्वागत करण्यात आले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाप्रमुख शैलेंद्र नलवडे, प्रभारी शहरप्रमुख निखील पवार, विभाग प्रमुख किसन यादव, विभाग प्रमुख तुषार वाडकर, मच्छिंद्र भोसले, अक्षय तावरे, प्रल्हाद गोडसे, कृष्णा चव्हाण, शांताराम भंडलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*जय महाराष्ट्र*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*आपला नम्र सेवक,*
*प्रदिप हरिभाऊ झणझणे,*
*शिवसेना फलटण तालुका प्रमुख,*
*फलटण तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालय, आयसीआयसीआय बँकेसमोर मोनिता गार्डन, लक्ष्मीनगर, फलटण.*
*संपर्क क्रमांक : 8600138961, 7774096430.*