ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कात्रज:-दुर्गंधी-सांडपाण्याने डासांचे थैमान… महापालिकेचे दुर्लक्ष.

प्रतिनिधी:- रफिक शेख पुणे:-9021132121

दुर्गंधी-सांडपाण्याने डासांचे थैमान… महापालिकेचे दुर्लक्ष.

कात्रज, दि. 31 (रफिक शेख ) : येथील संतोषनगर परिसरामधील नाले कचर्‍याने तुडूंब वाहत आहेत शिवाय नाल्यात दुर्गंधीयुक्त पाणी सोडत असल्याने नागरिक हैराण झाले असून आजाराने त्रस्त झाले आहेत मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.

पुणे शहरातील कात्रज हे दक्षिण प्रवेशद्वार आहे. कात्रजचा महापालिकेत समावेश होऊन बरेच वर्षे झाली मात्र आजही या भागात लोकसंख्येच्या प्रमाणात नागरी सुविधांचा दुष्काळ आहे.

पावसाळ्यात या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी येत असते येथे टाकलेला कचरा नात्यातील प्रवाहाला अडथळा निर्माण करते आणि हा नाला रुंदीला कमी असल्याने जास्त पावसाने जमिन लेवल असलेल्या घरात नाल्यातील पाणी शिरते.

याबाबत वारंवार महापालिकेला तक्रार करुनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे. या परिसरातील दुर्गंधी आणि सांडपाण्यामुळे ढासांचे प्रमाण वाढले आहे जेणेकरून नागरिक व लहान मुले थंडी तापाने आजारी पडत आहेत.

या भागाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सफाई कामगार येत नसले तरी दरमहा नागरिकांकडून कचरा गोळा करण्याचे पैसे घेत असतात. नाल्यात कचरा टाकणार्‍या लोकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी असे या परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button