ताज्या घडामोडी

सातारा:-फिनिक्स अकॅडमी, सातारा येथे स्टेम सेल डोनर नोंदणी व प्लेटलेट डोनर कॅम्प उत्साहात संपन्न.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-फिनिक्स अकॅडमी, सातारा येथे स्टेम सेल डोनर नोंदणी व प्लेटलेट डोनर कॅम्प उत्साहात संपन्न.

सातारा:- ओबीसी बारा बलुतेदार विभाग, सातारा, दात्री फाऊंडेशन, पुणे आणि वैद्यकीय मदत कक्ष, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिक्स अकॅडमी, सातारा येथे स्टेम सेल डोनर नोंदणी व प्लेटलेट डोनर कॅम्प उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.
या कॅम्पमध्ये स्टेम सेल आणि प्लेटलेट दानाचे महत्त्व, रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर), थॅलेसेमिया तसेच इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी डोनरची आवश्यकता याबाबत तज्ज्ञांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. स्टेम सेल डोनर नोंदणीची प्रक्रिया, तिची सुरक्षितता आणि समाजासाठी असलेले महत्त्व याविषयीही माहिती देण्यात आली.
कॅम्पला युवक-युवती, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी स्वेच्छेने स्टेम सेल डोनर म्हणून नोंदणी करून तसेच प्लेटलेट दानासाठी पुढाकार घेत समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, एका स्टेम सेल डोनरमुळे रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णाला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी अशा जनहिताच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्टेम सेल व प्लेटलेट डोनर म्हणून पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
आरोग्य जनजागृती आणि मानवसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आला. समाजात रक्तदान, प्लेटलेट दान आणि स्टेम सेल दानाविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण करणारा ठरला. या शिबिरात २४५डोनर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपस्थित ओबीसी बारा बलुतेदार विभाग सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. आबासाहेब महामुनी, शिवसेना श्रमिक कामगार सेना सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.उदय भाऊ राठोड, वैद्यकीय कक्ष अध्यक्ष श्री.दत्तात्रय भोईटे जिल्हा समन्वयक किशोर काका भोईटे कोरेगांव ,कोरेगांव तालुका उपाध्यक्ष निलेश सुतार, श्री.अजित दगडे, श्री.महेश पुजारी, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख व सातारा जिल्हा प्रभारी, फलटण तालुका संघटक प्रेम कुमार धर्माधिकारी, दात्री फाउंडेशनचे मगदुम सर, काशीद सर, प्रवीण लेंभे सर , नवनाथ पवार, उमेश चव्हाण, सागर गावडे यांनी सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button