आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वसतिगृह, नालेगाव येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 श्रीरामपूर:-श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वसतिगृह, नालेगाव येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न.

श्रीरामपूर (प्रतिनिधी):
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वसतिगृह, नालेगाव येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, शिस्त, संस्कार आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल पैठणकर हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष श्री विलास (भैय्या) सुरासे, संस्थेचे सदस्य श्री दत्तात्रय सुरासे, शाळेचे प्राचार्य बी. एम. हजारे तसेच वसतिगृहाच्या अधीक्षिका मंजुळा सपकाळ मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय प्रमोद पठारे, मधुकर त्रिभुवन, समाधान सुरासे, अमोल त्रिभुवन, ज्ञानदेव तायडे (मामा), विशाल साबळे, भगवान सुरासे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, नियमित अभ्यास, शिस्तबद्ध जीवनशैली, आरोग्य, स्वच्छता तसेच पालक व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद राहण्याचे महत्त्व उपस्थित मान्यवरांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी वसतिगृह आणि शाळेच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पालकांनी विद्यार्थ्यांच्या राहणीमान, शिक्षण, सुविधा व शिस्तीबाबत समाधान व्यक्त करत विविध सूचना मांडल्या. संस्थेच्या वतीने त्या सूचनांचा सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन वसतिगृह प्रशासन आणि शिक्षकवृंद यांनी केले. पालक, शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे हा पालक मेळावा अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button