आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-कै.स्व.आशुतोष शंकर पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान व मोफत ईसीजी शिबिर उत्साहात संपन्न.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-कै.स्व.आशुतोष शंकर पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान व मोफत ईसीजी शिबिर उत्साहात संपन्न.

वाई | प्रतिनिधी
कै. स्व. आशुतोष शंकर पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मानाचा गणपती मंडळ, ब्राह्मणशाही (वाई) आणि बेल एअर हॉस्पिटल, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत ईसीजी तपासणी शिबिर शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी कृष्णाबाई मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून तसेच कै. स्व. आशुतोष शंकर पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी मानाचा गणपती मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यानंतर मानाचा गणपती मंडळाचे कार्याध्यक्ष धनंजय मलटणे, नगरसेवक भारत (दादा) खामकर, विशाल मोरे, काशिनाथ (मामा) शेलार आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निखिल सावंत यांनी केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अनिल सावंत, सनी दादा चव्हाण, शैलेंद्र देवकुळे, सुशील खरात, जीविता जमदाडे, ज्योती गांधी यांच्यासह अनेक नगरसेवक व मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिरात मानाचा गणपती मंडळाचे सर्व सभासद तसेच संघर्ष प्रतिष्ठान, शंकरी कट्टा प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वाई योग सेवा समिती, सिंहगर्जना ढोल-ताशा पथक, कृष्णा नदी सेवा समिती, साई सेवा समिती आणि विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात वाई शहर व तालुक्यातील तब्बल २०७ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तसेच ९० नागरिकांची मोफत ईसीजी तपासणी करण्यात आली. या उपक्रमामुळे आरोग्य जनजागृतीसह गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कै. स्व. आशुतोष शंकर पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजहितासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button