आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-सद्गुरु यशवंत बाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) खटाव:-सद्गुरु यशवंत बाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

मायणी तालुका खटाव येथील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरु यशवंत बाबा मंदिरात गुरुपौर्णिमा व उत्साह पूर्ण वातावरण संपन्न झाली पहाटेपासून मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती हजारो भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून आपल्या सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला गुरुपौर्णिमा निमित्त मंदिरात विशेष पूजन, अभिषेक, आरती, नामस्मरण, हरिपाठ, गुरुचरित्र वाचन, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले होते मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आकर्षक फुलांचीसजावट यामुळे धार्मिक वातावरण उजळून निघाले होते यावेळी उपस्थित भाविकांनी यशवंत बाबा यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करीत होते अनेक भक्तांनी आपल्या कुटुंबासाठी सुख समाधानाची याचना केली होती मंदिरात भाविकां साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने स्वयंस्फूर्त व सेवाभावी वृत्तीने काम केले या सोहळ्यासाठी मंदिर समिती ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ, व स्वयंसेवक यांची सहकार्य लाभले या पावन सोहळ्याने मायणी परिसर भक्तीरसात नाहून गेला होता.

2) सांगलीत गुरुपौर्णिमा अंतर्गत गुरु कृतज्ञता दिन उत्साहात साजरा.

ग्रह संकेत ज्योतिष विद्यालय राजाराम नगर इस्लामपूर यांच्या विद्यमाने गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुरुकृतज्ञता दिन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी, ज्योतिष अभ्यासक विविध क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित होते उत्कृष्ट नियोजन, वेळेचे काटेकोर पालन, आणि सहभागींचा उत्कृष्ट प्रतिसाद यामुळे सोहळा संस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदीप कुलकर्णी अतिरिक्त कमिशनर जीएसटी पुणे यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी वेद संपन्न नंदकुमार जोशी वरुड तालुका खटाव हे होते प्रमुख उपस्थिती प्रदीप पंडित सर, प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ सुनीता साने यांची उपस्थिती लाभली प्रारंभी गुरुच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली गुरु शिष्य परंपरेचे महत्व, संस्कार मूल्य आणि गुरुचे जीवनात स्थान याविषयी वक्त्यांनी प्रभावी विचार मांडले. ज्योतिष पंडित एस जी कुलकर्णी यांनी गुरु निंदा याविषयी सखोल मार्गदर्शन केले गुरुचा अपमान झाल्यावर पाप पुण्याचा परिणाम काय होतो हे सांगितले सुनिता साने यांनी अंकशास्त्रावर विशेष मार्गदर्शन केले तसेच जन्मतारखेतील अंकाचे महत्व पटवून दिले जन्म तारखे तील अंकावर व्यक्तीच्या जीवनात काय परिणाम होतो हे सांगितलं उद्घाटक प्रदीप कुलकर्णी यांनी जीएसटी व जीपीएस यासारख्या संकल्पना व ज्योतिष शास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी विचार मांडले आपले अध्यक्षीय भाषणात नंदकुमार जोशी यांनी गुरूंचे महत्त्व ,संस्काराची परंपरा, जीवनातील योग्य दिशा, याविषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी चौगुले सर यांनी सादर केलेल्या चारोळ्यांनी भावनिक वातावरण बदलले कार्यक्रमासच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक संयोजक आजी माजी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन ज्योतिष पंडित स्वाती सुतार यांनी केले शेवटी जीएस कुलकर्णी यांनी आभार मानले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button