क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारती विद्यापीठ:-(पुणे)-आरोपीकडुन १ पिस्टल व १ जिवंत काडतुस हस्तगत भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 भारती विद्यापीठ:-(पुणे)-आरोपीकडुन १ पिस्टल व १ जिवंत काडतुस हस्तगत भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.

दिनांक २९/०७/२०२६ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भिलारेवाडी, महानंद डेअरीजवळ, पुणे येथे अग्नीशस्त्रासह थांबला आहे.
त्याप्रमाणे लागलीच पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता तेथे इसम नामे विशाल प्रल्हाद कलवले, वय २६ वर्षे, धंदा काही नाही, रा. महानंदा दुध डेअरी शेजारील, ज्ञानेश्वरी हाईटस, पहीला मजला, भिलारेवाडी, ता. हवेली, जि. पुणे हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व १०००/- रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुसांसहीत दिनांक २९/०७/२०२६ रोजी १३.२७ वा मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३९३/२०२६, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर, तसेच राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Mir) (मानसिंग पाटील) वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button