ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज :-पसरणी वाई घाटात बर्णीग कारचा थरार

प्रतिनिधि:- आशितोष चव्हाण

पसरणी घाटात भर दुपारी बर्निंग कारचा थरार

बर्निग कारचा थरार :-  पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाने विझवली आग

प्रतिनिधि:- अशीतोष चव्हाण

वाई येथील पसरणी घाटात भर दुपारी बर्निंग  कारचा थरार पाहायला मिळाला. पॉवेल येथील रहिवासी असलेले ओंकार बसवत व सुजीता बसवत हे बहीण-भाऊ टाटा टिगर कारमधून महाबळेश्वरला फिरण्यासाठी जात असताना गुरुवारी १४ रोजी दुपारी पसरणी घाटात धावत्या कारने अचानक पेट घेतला. दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यांनतर त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पॉवेल येथील रहिवासी असलेले ओंकार कृष्णा बसवत (वय ४०) आणि त्यांची बहिण सुजीता कृष्णा बसवत हे आज गुरुवारी त्यांच्या टाटा टिगर कारमधून (एमएच ०१ डीपी ०८५१) महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, पसरणी घाट चढताना दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागल्याचे कारचालक ओंकार बसवत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ कार घाटरस्याच्या कडेला ऊभी करुन कारचेबोनेट ऊघडले असता कारने अचानक पेट घेतला. बघता-बघता आगीने उग्ररुप धारण केले. आणि क्षणार्धात कार जळून खाक झाली.

  1. या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे व पाचगणी पोलिस ठाण्याचे पिएसआय यशवंत महामुलकर आणि सहाय्यक फौजदार अरविंद माने यांना समजताच त्यांनी वाई आणि पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. त्यानंतर पाचगणी नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाने घटनास्थळी धाव घेत कारला लागलेली आग विझवली. दरम्यान, पसरणी  घाटात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
    अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. उष्णता खुप आहे सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी असे सर्व प्रवाशांकडून ऐकायला मिळत होते.
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button