फलटण:-अयोध्येचा राजा गणेश मंडळाचे प्रबोधनाचे उपक्रम कौतुकास्पद – अनिलकुमार कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
अयोध्येचा राजा गणेश मंडळाचे प्रबोधनाचे उपक्रम कौतुकास्पद – अनिलकुमार कदम.
फलटण:- फलटण शहरातील गोळीबार मैदान लक्ष्मी नगर मधील अयोध्येचा राजा गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षण, मनोरंजनात्मक खेळ, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला, नृत्य, महिलांसाठी संगीत खुर्ची,भजन, महाप्रसाद यासारखे सामाजिक प्रबोधनाचे विविध उपक्रम हे कौतुकास्पद आहेत असे विचार मुक्त पत्रकार लेखक कवी साहित्यिक अनिलकुमार कदम यांनी अयोध्येचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या भेटी प्रसंगी व्यक्त केले.
ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी अयोध्येचा राजा गणेशोत्सव मंडळ घेत असून गणेशोत्सवासाठी वर्गणीची कोणालाही सक्ती नाही.हि या गणेशोत्सवात मंडळाची उल्लेखनीय विशेष बाब आहे.अशी माहिती पारस नांदले यांनी दिली.
अयोध्येचा राजा गणेशोत्सव मंडळाला कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव वगैरे पदाधिकारी नसतात तर सर्वजण एकत्रितपणे एकदिलाने नियोजन व कामकाज करतात.यामध्ये सर्वजण मिळून मिसळून आनंददायी पध्दतीने गणेशोत्सव साजरा करतात.लहान थोर गणेशभक्त मंडळी आनंदाने सहभागी होतात.
साईश वाळा,पारस नांदले,तेजस शिंदे, रोहित तरडे, चेतन बरळ,सौरभ बनकर,शुभंम नांदले, स्वप्निल पांडे,दिव्यांक गौंड हि अयोध्येचा राजा गणेशोत्सव मंडळाची टिम आहे.