सातारा:-कामगारांच्या विविध प्रश्नांवर उदयभाऊ राठोड यांची सरकारी कामगार अधिकाऱ्यांशी चर्चा.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-कामगारांच्या विविध प्रश्नांवर उदयभाऊ राठोड यांची सरकारी कामगार अधिकाऱ्यांशी चर्चा.

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना (शिवसेना) सातारा जिल्हाध्यक्ष उदयभाऊ राठोड यांनी सातारा जिल्ह्याच्या सरकारी कामगार अधिकारी अदिती वालावलकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील कामगारांच्या विविध समस्या व अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
असंघटित कामगारांचे प्रश्न, वेतन, कामगार कल्याण योजना, कामगारांची सुरक्षितता तसेच शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य कामगारांपर्यंत पोहोचविण्याबाबत महत्त्वपूर्ण विषय मांडण्यात आले. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी उदयभाऊ राठोड यांनी केली.
यावेळी कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. या भेटीप्रसंगी संघटनेचे लोकसभा अध्यक्ष राजू केंजळे (मेजर), भरत रावळ, उमेश चव्हाण, नवनाथ पवार, स्वप्नील शिंदे, सागर गावडे, हणमंत खताळ, गणेश मांडावे, संजय राठोड, विकास आतार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना (शिवसेना) सातत्याने संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
⛳ श्रमिकांचा सन्मान – हाच आमचा अभिमान! ⛳




