ताज्या घडामोडी

कराड:-३५०० रुपयांच्या वादातून तरुणावर दगडाने खुनी हल्ला; नाकाचे हाड फ्रॅक्चर.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कराड:-३५०० रुपयांच्या वादातून तरुणावर दगडाने खुनी हल्ला; नाकाचे हाड फ्रॅक्चर.

कराड शहरातील मलकापूर फाट्यावरील वसंतराव शिंदे यांच्या गेटशेजारी जुन्या पैशांच्या वादातून एका तरुणावर दगडाने आणि बुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुजीफ मिरासाहेब नदाफ (वय ४३, रा. मलकापूर) गंभीर जखमी झाला असून त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजता मुजीफ नदाफ हा मलकापूर फाट्याजवळ थांबला होता. त्यावेळी तेथे आलेल्या जुनेद रियाज मुजावर (रा. मलकापूर) याने त्याच्याकडे ३ हजार ५०० रुपयांची मागणी केली. मात्र, “मी तुझ्याकडून कोणतेही पैसे घेतलेले नाहीत,” असे मुजीफने सांगताच जुनेद संतापला.

2) कराड:-साळशिरंबेच्या विकासाला गती! आ. डॉ. अतुल भोसले यांचा २२ लाखांचा निधी मंजूर.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील साळशिरंबे (खुडेवाडी) गावाच्या विकासासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना आता वेग मिळणार आहे.
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने विविध विकासकामांसाठी निवेदन सादर केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत श्री हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ७ लाख रुपये, तर जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन वर्गखोली उभारण्यासाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
यावेळी आ. डॉ. भोसले यांनी “साळशिरंबे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाही दिली.
या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून गावाच्या विकासाला नवी चालना मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. भाजपा सोशल मीडिया सातारा जिल्हाध्यक्ष पंकज पाटील यांनी हा निर्णय गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
यावेळी पंकज पाटील, वसंतराव मोहिते, तानाजी पवार, विलास चवरे, अंकुश पाटील, हणमंत यादव, दादासो पाटील, सौरभ चवरे, अभिराज पाटील, संकेत पाटील, गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button