आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:- मुंबईत पत्रकारितेचा दिमाखदार सोहळा; राष्ट्रीय अध्यक्ष तथा संपादक मा.श्री.प्रल्हाद चव्हाण यांचा ‘अजेय लेखणी’ पुरस्काराने गौरव.

पत्रकार संदेश उणवरकर मुंबई शहर सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:- मुंबईत पत्रकारितेचा दिमाखदार सोहळा; राष्ट्रीय अध्यक्ष तथा संपादक मा.श्री.प्रल्हाद चव्हाण यांचा ‘अजेय लेखणी’ पुरस्काराने गौरव.

मुंबई | प्रतिनिधी
पत्रकारिता,समाजसेवा, साहित्य,कला आणि संपादकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ यांच्या वतीने आयोजित पहिला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य आणि समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६ रविवारी, १२ जुलै २०२६ रोजी मुंबईतील दादर (पूर्व) येथील सुरेंद्र गवास्कर हॉल (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय) येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला.

या भव्य सोहळ्यात ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा RPS STAR NEWS चे संपादक मा.श्री.प्रल्हाद प्रेमा हणमंत चव्हाण यांना पत्रकारिता, संपादकीय नेतृत्व, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले निडर कार्य, भ्रष्टाचाराविरोधातील सातत्यपूर्ण लढा आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत प्रतिष्ठेचा “अजेय लेखणी” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान केवळ श्री.प्रल्हाद चव्हाण यांचाच नसून सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारितेचा गौरव असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
या सोहळ्यास अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार व जादूगार श्रीधर कीर
“कुटुंब रंगलंय काव्यात”चे सादरकर्ते प्रा.विसुभाऊ बापट
प्रसिद्ध कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, साहित्याचार्य व संपादक पंढरीनाथ तामोरे
ज्येष्ठ पत्रकार व जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर
अ‍ॅड. सुनिल भार्गवराम शिर्के
यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुके आणि गावांमधून पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री.महेश भिकाजी तेटांबे यांनी उत्कृष्ट नियोजनातून हा पुरस्कार सोहळा यशस्वी करून पत्रकार, साहित्यिक आणि समाजसेवकांचा गौरव करण्याची प्रेरणादायी परंपरा सुरू केली.
‘अजेय लेखणी’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. प्रल्हाद चव्हाण यांनी हा सन्मान जनतेच्या विश्वासाचा असल्याचे सांगत,अन्याय,अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधातील आपला लढा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा पुरस्कार सोहळा पत्रकारिता, साहित्य, कला आणि समाजसेवेतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button