श्रीरामपूर:-जयहिंद लोकचळवळ यांचे वतीने मंत्री ना.जयकुमार रावल यांचे हस्ते श्री रमेश गुंजा यांना युवा शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

जयहिंद लोकचळवळ यांचे वतीने मंत्री ना.जयकुमार रावल यांचे हस्ते श्री रमेश गुंजा यांना युवा शेतकरी सन्मान पुरस्कार प्रदान.

श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) जयहिंद लोकचळवळ ‘ महाराष्ट्र राज्य आयोजित युवा शेतकरी सन्मान सोहळा २०२६ हा राज्यस्तरीय भव्य आणि प्रेरणादायी सोहळा मा . राजकुमार रावल (पणण व राजशिष्टाचार मंत्री ‘ महाराष्ट्र राज्य ) मा . बाळासाहेब थोरात ( माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य ) मा . भास्कर भगरे ( खासदार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ ) मा .आ मनोज कायंदे ( आमदार विधान सभा ) मा डॉ सुधीरजी तांबे ( माजी सदस्य विधान परिषद ) मा . विलास शिंदे ( संचालक सह्याद्री फार्म्स ) आणि मा . दुर्गाताई तांबे ( माजी नगराध्यक्षा यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याच प्रतिष्ठित मंचावर गटशेतीच्या माध्यमातून शेडनेट आधारित भाजीपाला उत्पादन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि प्रगतशील शेतकरी मा .श्री रमेश लहानुभाऊ गुंजाळ ( मु खांडगाव ता संगमनेर जि अहिल्यानगर ) यांना ” युवा शेतकरी सन्मान २०२६ ” या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे
हा सन्मान केवळ एका व्यक्तीच्या कार्याचा नसून कष्ट जिद्द , आधुनिक शेती , नाविन्य पूर्ण विचार गटशेतीची यशस्वी वाटचाल आणि शेतकरी प्रगतीसाठी वहिलेल्या समर्पित आयुष्याचा गौरव आहे , आपल्या दुरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमांमुळे असंख्य शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची प्रेरणा ‘ आत्मविश्वास आणि यशाचा नवा मार्ग मिळाला आहे
आज रमेशभाऊंचा सन्मान म्हणजे खांडगावचा सन्मान ‘ संगमनेरचा सन्मान अहिल्यानगर जिल्ह्याचा सन्मान आणि प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याच्या स्वप्नांचा सन्मान आहे . आपल्या कार्याने शेतीला नवी दिशा दिली असून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आपण सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात ईश्वर चरणी हीच प्रार्थना की आपण असेच शेतकरी हितासाठी अविरत कार्य करत राहावे , आधुनिक शेतीचा संदेश घराघरात पोहोचवत राहावे आणि आपल्या कार्याचा गौरव राज्यासह राष्ट्रीय स्तरावरही होत राहावा
” मा श्री रमेश लहानुभाऊ गुंजाळ यांना ” युवा शेतकरी सन्मान २०२६ ” या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल मनः पूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालींसाठी लाख लाख शुभेच्छा
” ज्यांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलते , त्यांचाच सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा खरा उत्सव ”




