ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-पंतप्रधान मोदींसाठी रस्त्यावर उतरणारे युगपुरुषांच्या अवमान बाबत मौन धारण का? सातारकरांचा सवाल.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

पंतप्रधान मोदींसाठी रस्त्यावर उतरणारे युगपुरुषांच्या अवमान बाबत मौन धारण का? सातारकरांचा सवाल.

 

सातारा दि: भाजपचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या बेतल वक्तव्यातून अवमान केला होता. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल यांनी तर फुले त्याबद्दलही गरज ओळखली होती त्यावेळेला भाजपच्या महिला माता-भगिनी गप्प बसल्या होत्या. त्यावेळेला पुरुषांच्या विचाराबाबत अथवा ओबीसी समाजाबाबत प्रेम आटले होते का? आता मात्र मोदींवर टीका झाल्यानंतर रस्त्यावर उतरणारे भाजपचे खरे रूप पुन्हा एकदा प्रकट झालेले आहे. अशा शब्दात सातारकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काही गोष्टी या राजकीय नेते विसरून जातात पण जनता लक्षात ठेवतात. म्हणूनच पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नगरसेवक श्रीपाद छिंदम या नगरसेवकाला अजूनही भाजपने पदमुक्त केले नाही .उलट त्याचा गौरव केला. अशा बेगडी प्रेम करणाऱ्या भाजपला खरं म्हणजे नैतिक या शब्दाबद्दलच आदर नसल्याने त्यांच्याबद्दल फारसं बोलणं उचित नाही. अशा शब्दात शिवप्रेमी मनोज काकडे, संभाजीराव पाटील, दिपक काळे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. आज मोठ्या प्रमाणात जातीयवाद थोपवला गेलेला आहे. जातीय व पक्ष द्वेष अनेकांच्या अंगात चांगल्याच पद्धतीने भिनलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तर ते कुणी खपवून घेणार नाही .सर्वाधिक जास्त राग हा अल्पसंख्यांक व ओबीसी आणि मराठा बांधवांना येत असतो. पण, आता जे कोणी रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक किती जण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले ? याचा आता त्यांनी हिशोब द्यावा. कारण, बहुजनांची गर्दी जमून प्रेम दाखवणे. आता त्यांनी थांबवावे .अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल अशा शब्दांमध्ये बहुजन समाजाचे शिवाजीराव काळे, बबनराव शिंदे, प्रकाश सावंत, प्रदीप भोसले, सौ अनुसया साबळे ,सौ बबीता माने यांनी सांगितले.
राष्ट्रीय काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा इतर राजकीय पक्ष यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही भाजप पक्षाची तर मुळीच देणे घेणे नाही. आमचं राजकारणाशी काही देणे घेणे. आम्हाला सर्व युगपुरुष प्रिय आहेत. असेही त्यांनी सांगितले.त्यांना राजकारण करायचं असेल त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावे.
सध्या वाढती महागाई, गुंडगिरी, बेरोजगारी तसेच निकृष्ट दर्जाचे रस्ते, अनेक गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. सामान्य माणसांना जगणे अशक्य झाले आहे. याचा त्यांना विसर पडला असून दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांच्या जीवावर निवडणुका लढवण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांचं अस्तित्व सुद्धा दुसऱ्याच्या पक्षातील नेत्यांवर अवलंबून आहे. अशा मंडळींनी आंदोलन करताना आपल्या मूळ पक्षातील किती लोक सामील झाले ? हे एकदा आरशात पाहावे. असेही सल्ला देण्यात आला आहे.
खऱ्या अर्थाने युगपुरुषांच्या विचाराचे सातारा जिल्ह्यातील अनेक बांधव अनुयायी व हितचिंतक आहेत. आमच्या नेत्याने जरी युगपुरुषांची जर अवमान केला तर त्या नेत्यांनी जाब विचारण्याची आमच्याकडे नैतिकता आहे असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टिके बाबत त्यांना भाजपला ओबीसी बांधवांवर किती प्रेम आहे ? हे ओबीसी बांधव चांगलेच जाणून आहेत ओबीसी बांधवांवर प्रेम असेल तर आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत किमान सातारा जिल्ह्यातील निम्म्या मतदारसंघात ओबीसी उमेदवार देण्याचे धाडस दाखवावे. असे ही शेवटी आठवण करून दिली आहे.
——————————————–
फोटो -साताऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध नोंदवताना यापूर्वी घटनेबाबत भाजपच्या नेत्यांनी मौन धारण का केले याची आठवण अनेकांना आली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button