गोरेगाव वांगी:-(पुसेसावळी)-गायरान जमीन सौर ऊर्जा प्रकल्पास देण्यास गोरेगाव ग्रामस्थांचा नकार.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
गायरान जमीन सौर ऊर्जा प्रकल्पास देण्यास गोरेगाव ग्रामस्थांचा नकार.
मौजे गोरेगाव वांगी येथील गायरान गट नंबर 173 मधील एकूण क्षेत्र 14 हेक्टर हे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले होते.
परंतु गोरेगाव वांगी ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विचारात न घेता मंजुरी दिल्याने तसेच सदर क्षेत्रामध्ये सुमारे 3000 झाडांची वृक्ष लागवड असल्याने व गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची जनावरे चरण्यासाठी सदर क्षेत्रामध्ये जात असल्याकारणाने तसेच सदर क्षेत्रामधून शेतीसाठी जाणारे अनेक रस्ते असल्यामुळे व सदर क्षेत्रामध्ये गावातील घनकचरा व्यवस्थापन होत असल्याकारणाने ग्रामस्थांनी सदर योजनेस विरोध केला आहे.
गावासाठी इतर कोणतेही क्षेत्र नाही त्यामुळे सदरचे क्षेत्र हे गायरान म्हणून गावासाठी राखीव क्षेत्र असल्याकारणाने ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी भविष्यासाठी सदर जागेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोरेगाव वांगी ग्रामस्थांनी सदरच्या योजनेस कडाडून विरोध केला आहे ग्रामस्थांकडून दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान सदरच्या क्षेत्रामध्ये अमरण उपोषण करण्यात आले होते त्यावेळी उपोषण स्थळी खटाव तालुका तहसीलदार मा.बाई माने तसेच मा. प्रांताधिकारीसो. उज्वला गाडेकर मॅडम व महसूल विभागाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून ग्रामस्थ व मा.जिल्हाधिकारीसो यांच्याशी लवकरच चर्चा घडवून आणण्याचे आश्वासित केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.
त्या अनुषंगाने उद्या दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4:30 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदर योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यास साठी गोरेगाव वांगी ग्रामपंचायत व ग्रामस्थांना नोटीस द्वारे सूचित करण्यात आले आहे.