ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बाभळेश्वर लोणी खुर्द शिव रस्त्यावर बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.
प्रतिनिधी:- कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

बाभळेश्वर( वार्ताहर )बाभळेश्वर लोणी खुर्द शिव रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे बिबट्याला त्या ठिकाणी लपण्याची मोठ्या प्रमाणात जागा आहे त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाण्यास भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे
तरी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावा अशी मागणी या परिसरातून शेतकरी करत आहे
बिबट्या जर बंद करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी बाळासाहेब आहेर. बापू आहेर. रवींद्र आहेर .विलास आहेर. नानासाहेब आरगडे .सुनील बेंद्रे. प्रभाकर बेंद्रे .दौलत बेंद्रे. ज्ञानेश्वर बेंद्रे. आदित्य येथील ग्रामस्थांनी केलेली आहे.