पुसेसावळी:-चोराडे परिसरात निसर्गाची रंगीत उधळण; आकाशात खुलले इंद्रधनुष्य.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

चोराडे परिसरात निसर्गाची रंगीत उधळण; आकाशात खुलले इंद्रधनुष्य.

चोराडे (ता. खटाव) :
पावसाच्या हलक्या सरींनंतर चोराडे परिसरातील आकाशात रंगांची मनमोहक उधळण करत इंद्रधनुष्याचे सुंदर दर्शन घडले. या रम्य दृश्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या नयनरम्य क्षणाचे छायाचित्रे व व्हिडिओ टिपले.
काळ्याभोर ढगांच्या पार्श्वभूमीवर उमटलेल्या सात रंगांच्या इंद्रधनुष्याने संपूर्ण परिसराला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले. काही काळ टिकलेल्या या अद्भुत निसर्गचित्राने नागरिकांना आनंदाचा आणि समाधानाचा अनुभव दिला. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी हे दृश्य पाहण्यासाठी घराबाहेर गर्दी केली.
तज्ञांच्या मते, सूर्यप्रकाश पावसाच्या थेंबांमधून अपवर्तन व परावर्तन होऊन इंद्रधनुष्याची निर्मिती होते. पावसाळ्यात अशा दृश्यांची अनुभूती अधिक वेळा येत असली, तरी प्रत्येक वेळी ते पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
“निसर्गाच्या रंगांची ही उधळण म्हणजे पृथ्वीवर उमटलेले आकाशाचे सुंदर हास्यच!” अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.




