कात्रज:-(पुणे)-“सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग ३८ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण, नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्यसेवा!”
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कात्रज:-(पुणे)-“सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; प्रभाग ३८ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण, नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्यसेवा!”

पुणे प्रतिनिधी : प्रभागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सुविधा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, प्रभाग क्र. ३८ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण शनिवारी, दि. २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पार पडणार आहे.
आंबेगाव, दत्तनगर आणि जांभूळवाडी परिसरानंतर आता कात्रज गाव व पंचक्रोशीतील नागरिकांनाही दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळणार असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
मा. स्थायी समिती सदस्या सौ. स्मिताताई सुधीर कोंढरे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेल्या या आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. चेतनदादा तुपे पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून, प्रभागातील मान्यवर नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा लोकार्पण सोहळा सर्व्हे नं. ४८, सेराटेक सोसायटी, गुजरवाडी फाटा, जाधव नगर, पुणे – ४६ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या नव्या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा, तपासणी व उपचार सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असून, आरोग्यसेवेच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यास परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन सौ. स्मिताताई सुधीर कोंढरे (नगरसेविका, पुणे महानगरपालिका) तसेच श्री. सुधीर विनायक कोंढरे (संस्थापक/अध्यक्ष – जनहित विकास मंच) यांनी केले आहे.




