शिरूर: शरद पवारांच्या पक्षाकडून तगडी फौज मैदानात; शिरूर बाजार समितीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट लढत.
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूर: शरद पवारांच्या पक्षाकडून तगडी फौज मैदानात; शिरूर बाजार समितीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट लढत.

शिरूर :
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून तब्बल २१४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता १८ जागांसाठी ५२ उमेदवार अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उरले असून महायुती आणि शरद पवार गटामध्ये थेट आणि अटीतटीची राजकीय लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी ही अधिकृत माहिती दिली.
अर्ज छाननीनंतर २६६ अर्ज वैध ठरले होते, मात्र अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
महायुतीची तगडी फौज मैदानात
महायुतीने आपल्या पॅनलमध्ये सर्वसाधारण आणि राखीव जागांवर तगडे उमेदवार उतरवले आहेत:
सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गट: प्रमोद पन्हाळे, संतोष शिंदे, शशिकांत दसगुडे, स्वप्निल गायकवाड, विजय ढमढेरे, राहुल गव्हाणे व बापूसाहेब शिंदे.
ओबीसी गट: राजेश लांडे.
विमुक्त जाती-भटक्या जमाती गट: सुहास मलगुंडे.
महिला राखीव गट: प्रतिभा नागवडे व सुजाता नरवडे.
ग्रामपंचायत मतदारसंघ (सर्वसाधारण गट): सागर दरेकर व संतोष मोरे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गट: संभाजी करडिले.
अनुसूचित जाती-जमाती गट: वैष्णव इसवे.
शरद पवार गटाचे चोख प्रत्युत्तर
महायुतीला तगडे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. माजी आमदार अशोक पवार यांनी पक्षाच्या वतीने माघारीच्या दुसऱ्याच दिवशी पॅनल स्थापन करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे आहेत:
सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गट: संतोष बाळासाहेब भोसले, विश्वास रामकृष्ण ढमढेरे, राजेंद्र रंगनाथ गायकवाड, संभाजी शिवाजी फराटे, उत्तम माणिकराव शेलार, ज्ञानेश्वर बबनराव थेरकर आणि शिवाजी सुखदेव वडुले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ: नामदेव महादेव जाधव.
ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ: बाळासाहेब दादाभाऊ जाधव.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ: नानासाहेब अनंथा साबळे.
सहकारी संस्था विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघ: सतीश भाऊजी कोळपे.
सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय (OBC) गट: विकास काशिनात शिवले.
महिला राखीव मतदारसंघ: शशिकला नानाभाऊ फुलसुंदर व राजश्री रवींद्र फराटे.
(याशिवाय इतरही काही उमेदवार वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.)
मतदारसंख्येचे गणित
या निवडणुकीत एकूण २ हजार ३१६ मतदार १८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत:
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ: ११ जागांसाठी १,५८९ मतदार
ग्रामपंचायत मतदारसंघ: ४ जागांसाठी २०६ मतदार
व्यापारी-आडते मतदारसंघ: २ जागांसाठी ४५४ मतदार
हमाल-मापाडी मतदारसंघ: १ जागेसाठी १३७ मतदार
बंडखोरीचे सावट
दोन्ही प्रमुख गटांनी आपले पॅनल जाहीर केले असले तरी अनेक अपक्षांनीही मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे अपक्षांची मोठी मांदियाळी जमा झाल्याने या बंडखोरीचा फटका नेमका कोणाला बसणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




