भारती विद्यापीठ:-(पुणे)-खुनाचे गुन्हयामध्ये पाहीजे असलेल्या आरोपीस शिताफीने पकडुन अटक भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

खुनाचे गुन्हयामध्ये पाहीजे असलेल्या आरोपीस शिताफीने पकडुन अटक भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १६३/२०२६ भारतीय न्याय सहिता १०३(१), ३(५) अन्वये गुन्हयातील मयत इसम तेजस दत्तात्रय पिलाणे वय २४ वर्षे, रा. मोहननगर, धनकवडी, पुणे याचा १. विशाल दत्तात्रय खोपडे २. अभिषेक दिलीप खोपडे, ३. सचिन हरीचंद्र धुळे ४. अदिनाथ शिवाजी कसवे, ५. आदित्य काका गायकवाड व त्याचे साथीदारांनी मिळून दिनांक २५/०४/२०२६ रोजी ०१.३० वा चे सुमारास शिवसृष्टी गदा चोकापासुन कात्रजकडे जाणाऱ्या सव्हीस रोडवर हत्यारांनी वार करुन खुन केला म्हणून गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्यातील आरोपी आदित्य काका गायकवाड याचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, संदीप आगळे, तुकाराम सुतार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी आदित्य काका गायकबाड हा लेकटाऊन रोडवर थांवला आहे. लागलीच त्यानुसार नमुद आरोपीचा लेकटाऊन भागात जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये दिनांक २४/०६/२०२६ रोजी २१.३० वा अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) केलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड, किरण सावळे, संदीप आगळे, तुकाराम सुतार, राहुल शेडगे, महेश वारवकर, मंगेश पवार, निलेश खेरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, यांच्या पथकाने केली आहे.
(मानसिंग पाटील) वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर




